तरुणीचा सेल्फीमोह नडला, १.३२ कोटींचं नुकसान

सेल्फी काढण्यासाठी ती गुडघ्यावर बसली, मात्र तिचा धक्का लागला आणि कलारचना पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे पडली.

Updated: Jul 17, 2017, 07:58 PM IST

लॉस अँजेल : लॉस अँजेलसमध्ये  एका तरुणीचा सेल्फीमोह कलाकाराला चांगलाच महागात पडला आहे. लॉस अँजेलसमध्ये आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात विविध कलाकारांनी आपल्या कलाकृती  मांडल्या, त्यापैकी एका कलाकृतीसोबत फोटो काढण्याचा मोह प्रदर्शनाला भेट देणाऱ्या एका तरुणीला झाला. 

सेल्फी काढण्यासाठी ती गुडघ्यावर बसली, मात्र तिचा धक्का लागला आणि कलारचना पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे पडली.

संबंधित कलाकृती पडल्यामुळे कलाकाराचं २ लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे २ कोटी ३२ लाख ६६ हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे तब्बल ३० तास खर्च करुन उभारलेली कलाकृतींचं होत्याचं नव्हतं झालं.