विद्यार्थीनींच्या निर्वस्त्र परफॉर्मन्सवर चौकशीचे आदेश

दक्षिण आफ्रिकेतील शाळेच्या मुलींनी निर्वस्त्र होऊन डान्स केल्याने शिक्षण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Updated: Jun 1, 2018, 11:29 PM IST
विद्यार्थीनींच्या निर्वस्त्र परफॉर्मन्सवर चौकशीचे आदेश title=

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेतील शाळेच्या मुलींनी निर्वस्त्र होऊन डान्स केल्याने शिक्षण मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या व्हिडीओत कोसा समाजातील विद्यार्थीनी एक लहानंस कापड अंगावर घालून डान्स करताना दिसत आहेत. याला इंकशिओ असं म्हटलं जातं. शिक्षण मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, मी यावर खूपच नाराज आहे, दु:खी आहे. मात्र दुसरीकडे हा डान्स बसवणाऱ्या व्यक्तीने, तसेच संगीत संचलन करणाऱ्या व्यक्तीने हे गौरवपूर्ण असल्याचं सांगून बचावात्मक पवित्रा घेतला आहे. मात्र शिक्षणमंत्र्यांनी हे संस्कृती आणि संस्कृती मुल्यांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका शिक्षकाने सांगितलं, आम्हाला आमच्या कोसा परंपरेवर गर्व आहे, आम्हाला इंकशिओवर गर्व आहे. तसेच आम्हाला कोसा महिला आणि मुलींवरही गर्व आहे, अशी प्रतिक्रिया डेली डिस्पॅच वेबसाईटने आपल्या वृत्तात दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेत कोसा हा एक जातीय समूह आहे.

हे प्रकरण या आठवड्याच्या सुरूवातीला चर्चेत आलं होतं, केपच्या एमटाटामध्ये एका स्पर्धतील फोटोंमध्ये या विद्यार्थीनी नाचताना दिसत होत्या. व्हिडीओचा एक भाग कोसा पंरपरेनुसार घेण्यात आल्याचं दक्षिण आफ्रिकेतील टाइम्सलाईव्ह वेबसाईटने म्हटलं आहे. या प्रकरणाला नंतर मोतसेखाच्या राष्ट्रीय विभागाला सोपवण्यात आलं आहे.

मोतसेखाच्या आधारावर एएफपी एजन्सीने म्हटलं आहे की, शिक्षकांकडून अशा प्रकारचा अनादर पूर्णपणे अनुचित आहे, या प्रकारचं शोषण होवू नये हे त्यांना समजायला हवं. आपली संस्कृती आणि परंपरांवर गर्व करणे चुकीचं नाही, पण अशी नग्नपणे डान्स करणे हे चुकीचे आहे. हे आपली संस्कृती आणि मुल्यांविरोधात आहे.