अर्थाचा अनर्थ! बॉसच्या Email मधील 'त्या' XX चा तिने वेगळाच अर्थ घेतला अन्...

जसे वागतो त्याहून अगदी विरुद्ध नोकरीच्या ठिकाणी वागतो. कारण, तिथं काही गोष्टींबाबत भान ठेवणं अपेक्षित असतो. नाहीतर, अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही...   

Updated: May 19, 2023, 11:19 AM IST
अर्थाचा अनर्थ! बॉसच्या Email मधील 'त्या' XX चा तिने वेगळाच अर्थ घेतला अन्... title=
Harassment Case On Boss because he bymistaken wrote xx word in email viral news

Harassment Case On Boss: नोकरीच्या ठिकाणी हल्ली सर्वच व्यवहार आणि कामांबाबतच्या औपचारिकतेसाठी Email वापरला जातो. अमुक एक काम करा, तमुक काम झालं नाही, ते का झालं नाही? वगैरे वगैरे कारणांसाठी नोकरीच्या ठिकाणी मेल केला जातो. अनेकदा सुट्टीची विचारणा करण्यासाठीसुद्धा मेलवरूनच वरिष्ठांशी संपर्क साधला जातो. हे मेल लिहिणं हीसुद्धा एक कलाच. 

मोजक्या शब्दांत नेमक्या आणि गरजेच्या गोष्टी मांडत आपलं म्हणणं पटवून देणं अनेकांनाच उत्तमरित्या जमतं तर, काही मंडळी मात्र यात घोळ घालतात. असाच घोळ एका Boss नं घातला आणि कंपनीतील महिला कर्मचाऱ्यानं त्यासा थेट कोर्टात खेचलं. 

मेलनं केलं फेल... 

the news outlet च्या वृत्तानुसार लंडनमधील पेपरलेस ट्रेड सोल्युशन्स देणाऱ्या essDOCS या कंपनीमध्ये IT प्रोफेशनल आणि प्रोजेक्ट मॅनेजर असणाऱ्या करिना गॅस्पेरोवानं Alexander Goulandris या तिच्या Boss वरच निशाणा साधला. ईमेलमध्ये लिहिलेल्या एका शब्दामुळं तिनं चक्क बॉसला कायदा दाखवला. इतक्यावरच न थांबता तिनं लैंगिक शोषण, भेदभाव आणि वाईट वागणुकीचे गंभीर आरोपही वरिष्ठांवर लावले. 

आता इथं मुद्दा असा, की खरंच त्या बॉसला असं काही म्हणायचं होतं? मग नेमकं झालं तरी काय? तिनं अर्थाचा अनर्थ केला खरा... पण तोही इतका? पाहा या प्रकरणात नेमकं काय घडलं... 
Alexander Goulandris यांनी मेलमध्ये लिहिलेला मजकूर खालीलप्रमाणं. करिनानं हाच मजकूर न्यायालयापुढं पुरावा म्हणून सादर केला होता. 

"Can you please complete the following:

The solution us currently used by xx Agris companies and yy Barge lines in corn cargoes in south-north flows in the ???? waterways.

Also, can you remind me of what the balance of the rollout will be and the approx. timing.

Thanks"

वरील मजकूर सादर करत, त्यामध्ये असणारे  "xx" चुंबनासाठी, "yy" लैंगिक संबंधांसाठी आणि "????" लैंगिक कृतींसाठी 'ती' केव्हा तयार असेल यासाठी इशारा म्हणन वापरले जात असल्याचं म्हटलं. त्यामुळं त्यांनी मेलमध्ये हे शब्द वापरणं अतिशय वाईट असल्याचा मुद्दा मांडला. बॉस आपल्यावर यासाठी ओरडले, कारण त्यांना Sexual Favour हवं होतं. दरम्यान, बॉसनं मात्र हे सर्व आरोप फेटाळले. 

हेसुद्धा वाचा : Unbelievable! आकाशात झेपावलेल्या विमानातून प्रवाशानं टीपले रॉकेट लाँच होतानाचे क्षण; ही दृश्य पाहून शब्दही विसराल 

 

रोजगार न्यायाधिकरणानं हे संपूर्ण प्करण ऐकून घेत करिनानं हे संपूर्ण प्रकरण स्वत:च्या सोयीनुसार मांडल्याचं निरीक्षण नोंदवलं आणि तिलाच कंपनच्या नावे 5,000 पाउंड (513012 रुपये) देण्याचे आदेश दिले.