नदीत मैत्रिणीसोबत उडी मारली,ती बाहेर आली...पण तो...

तो नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. दुसऱ्या दिवशी ३ किमी अंतरावर त्याचा मृतदेह सापडला, ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Updated: Aug 6, 2017, 08:01 PM IST

न्यूयॉर्क : अमेरिकेत १९ वर्षाच्या युवकाने आपल्या मैत्रिणीबरोबर नदीत उडी मारली. मैत्रीण मात्र सुखरूप बाहेर निघाली, पण तो नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. दुसऱ्या दिवशी ३ किमी अंतरावर त्याचा मृतदेह सापडला, ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

अमेरिकेत हिवाळ्यात नद्यांचं पाणी अधिक थंड आणि वेगाने प्रवाहित होतं, त्यात हा जीवघेणा प्रयोग केल्याने युवकाला जीव गमवावा लागला आहे. ही घटना ३० मे २०१७ रोजीची आहे, पण तो व्हिडीओ आता यूट्यूबवर ट्रेऩ्ड होत आहे. अंबोलीच्या घटनेनंतर हा व्हिडीओ यूट्यूबवर ट्रेन्ड करतोय.