धक्कादायक! HIV पॉझिटिव्ह सेक्स वर्करने 200 पुरूषांसोबत ठेवले शारीरिक संबंध; पोलिसांनी लोकांना केलं आवाहन

Hiv Positive Sex Worker : महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांनी पुढे येऊन स्वतःची चाचणी करून घ्यावी जेणेकरून समस्या आणखी वाढू नये, असं पोलिसांनी आवाहन केलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 21, 2024, 03:18 PM IST
धक्कादायक! HIV पॉझिटिव्ह सेक्स वर्करने 200 पुरूषांसोबत ठेवले शारीरिक संबंध; पोलिसांनी लोकांना केलं आवाहन title=
Hiv Positive sex worker Had 200 Clients

Hiv Positive sex worker : एचआयव्हीची लागण झाली तर व्यक्तीच्या उमेदीच्या काळामध्ये संपूर्ण आयुष्यावर आणि कुटूंबावर परिणाम होतो. भारतात प्रामुख्याने समाज आणि आर्थिक बाबतीत अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. एआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णाला समाजात खालच्या दर्जाची वागणूक मिळत नाही. पण परदेशात चित्र काहीसं वेगळं पहायला मिळतं. काही समज गैरसमज परदेशात स्पष्ट आहेत. परंतू, तिथं आजही एचआयव्ही म्हटलं की भीती कायम आहे. याचीच प्रचिती देणारी एक घटना नुकतीच समोर आलीये. अमेरिकेतील ओहायोमध्ये एका सेक्स वर्करने संपूर्ण शहराला टेन्शन दिलंय.

यूएसएमध्ये एका सेक्स वर्करने एचआयव्ही पॉझिटिव्ह असताना 200 हून अधिक लोकांशी शारिरीक संबंध ठेवल्याचं उघड झालंय. लिंडा लेकेसी असं या महिलेचं नाव आहे. व्यवसायाने सेक्स वर्कर असलेल्या या महिलेने जानेवारी ते मे या पाच महिन्यात तब्बल 200 हून अधिक लोकांशी लैंगिक संबंध ठेवले. मात्र, आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं तिला माहिती असताना देखील लोकांशी शारिरीक संबंध ठेवले. पोलिसांनी लिंडावर कारवाई केली आहे.

मेरीएटा हे व्हर्जिनियाच्या सीमेवर आग्नेय ओहायोमधील एक लहान शहर आहे. लिंडा लेकेसीने मेरीएटा येथील मार्केट स्ट्रीटच्या आसपासच्या परिसरात लोकांशी लैगिंक संबंध ठेवले. मात्र, ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं कळाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर पोलीस देखील अॅक्शन मोडवर आली. पोलिसांनी एक निवेदन जारी केलं अन् लोकांना याची माहिती दिली.

महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांनी पुढे येऊन स्वतःची चाचणी करून घ्यावी जेणेकरून समस्या आणखी वाढू नये, असं पोलिसांनी आवाहन केलंय. मेरीएटा आरोग्य विभागाने देखील नोटीस जारी केलीये, ज्यांनी कोणी लिंडाशी शारिरीक संबंध ठेवले आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे पुढं यावं आणि तपासणी करून घ्यावी, असंही निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, एड्ससाठी प्रबळ उपचार उपलब्ध नाहीत. मात्र एआरटी ( ART- Anti Retroviral Treatment) ही प्रभावी औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळं एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीचे आयुर्मान वाढू शकतं आणि जीवनशैलीचा दर्जादेखील उंचावू शकतो. मात्र, एकदा का ART सुरू केल्यानंतर आयुष्यभर ही औषधं आणि उपचार घ्यावं लागतात.