बेरोजगार तरूणाच्या 'या' एका स्मार्ट कामामुळे Google, Netflix मधून ऑफर्सचा पाऊस

मनासारखी नोकरी मिळणं आणि तिथं टिकून राहणं हे आजकाल अवघड होऊन बसलं आहे. 

Updated: Jul 31, 2018, 08:57 PM IST
बेरोजगार तरूणाच्या 'या' एका स्मार्ट कामामुळे  Google, Netflix मधून ऑफर्सचा पाऊस title=

अमेरिका : मनासारखी नोकरी मिळणं आणि तिथं टिकून राहणं हे आजकाल अवघड होऊन बसलं आहे. पदवीधर तरूण मंडळीदेखील आजकाल ग्रुप डी आणि सीच्या पदांसाठी अर्ज दाखल करत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. 

नोकरी मिळवण्यासाठी आजकाल ऑनलाईन मीडियामध्ये अनेक संधी आणि सोयी उपलब्ध आहेत. मात्र अमेरिकेतील तरूणाने नोकरी मिळवण्यासाठी एक अजब पर्याय निवडला आहे. 

डेविड कैसारेजची अजब  कहाणी 

काही दिवसांपूर्वी नोकरी गमावल्यानंतर डेविडने नवी नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याने रेझ्युमे पाठवायला सुरूवात केली. मात्र हा रेझ्युमे ऑनलाईन साईट किंवा संबंधित कंपन्यांच्या एच आरला न पाठवता रस्त्यावर लोकांमध्ये वाटायला लागला.  

कॅलिफॉर्नियाच्या रस्त्यावर रेझ्युमे वाटताना आपण भिकारी वाटू नये त्याने चक्क  एक पाटी लावली. या पाटीवर 'बेघर, यशाचा भूकेला.. रेझ्युमे घ्या' 
असे लिहले होते. 

डेविडचं शिक्षण टेक्सास युनिव्हर्सिटीतून झाले आहे. तेथे त्याने मॅनेजमेंटचा अभ्यास केला. 2014-17 या काळात त्याने जनरल मोटार्समध्ये काम केले. मात्र त्यानंतर काही कारणास्तव त्याला नोकरी गमवावी लागली. त्यानंतर कोणतीच कंपनी त्याला नवी जॉब ऑफर देत नव्हती. अशावेळेस वैतागलेल्या डेविडने नोकरी शोधण्यासाठी हा उपाय शोधला. 

डेविडच्या प्रयत्नांना यश  

जॅस्मिन स्कॉफील्ड या महिलेने त्यानंतर डेविडचा रेझ्युमे सोशल मीडियामध्ये शेअर केला.#GET DEVID A JOB अशा हॅशटॅगखाली तो व्हायरल झाला. त्यानंतर डेव्हिडला गूगल, नेट फ्लिक्स, लिंक्डीन सह 200 मोठ्या कंपन्यांकडून ऑफर मिळाली आहे.