Viral Video : बीवी नंबर वन! सौंदर्य स्पर्धेत पत्नी दुसरी आली म्हणून नवरा संतापला, स्टेजवर चढल्या अन् मग...

LGBTQ Beauty Pageant Video : पत्नीला सौंदर्य स्पर्धेत दुसऱ्या क्रमाक मिळाला म्हणून नवऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने स्टेजवर येत गोंधळ घातला. विजेच्याचा मुकुट हिसकावून घेत त्याने...

Updated: Jun 5, 2023, 03:56 PM IST
Viral Video : बीवी नंबर वन! सौंदर्य स्पर्धेत पत्नी दुसरी आली म्हणून नवरा संतापला, स्टेजवर चढल्या अन् मग... title=
Husband Breaks Winners Crown In Brazil After His Wife Comes Second at LGBTQ Beauty Pageant Husband Wife trending Video watch now

Husband Wife Viral Video : सलमान खान आणि करिश्मा कपूरचा बीवी नंबर वन चित्रपट आठवतो तुम्हाला? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये माझीच पत्नी नंबर  वन आहे असा असंच त्या नवऱ्यांचं म्हणं आहे. हा व्हिडीओ एका सौंदर्य स्पर्धेतील असून या स्पर्धेत त्याचा बायकोने सहभाग घेतला असतो. ज्यावेळी मिस गे माटो ग्रोसो 2023 (Miss Gay Mato Grosso 2023) स्पर्धेची घोषणा करण्याची वेळ आली तेव्हा त्याची पत्नी दुसऱ्यावर आली. या गोष्टीचा नवऱ्याला इतका राग आला की त्याने स्टेजवर येत गोंधळ घातला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video ) व्हायरल झाला आहे. (LGBTQ Beauty Pageant Video)

काय घडलं नेमकं ?

शनिवारी ब्राझीलमधील LGBTQ+ सौंदर्य स्पर्धेतील (LGBTQ Beauty Pageant) हा व्हिडीओ आहे.  व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अंतिम टप्प्यात नॅथली बेकर आणि इमानुएली बेलिनी पोहोचल्या होत्या. आता  मिस गे माटो ग्रोसो 2023 मान कोण पटकणार याकडे सर्वांच्या नजरा लागला होत्या. मुकुट कधी नॅथली बेकर तर कधी इमानुएली बेलिनी डोक्यावर हलविण्यात येतं होतं. अखेरच स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. (Husband Breaks Winners Crown In Brazil After His Wife Comes Second at LGBTQ Beauty Pageant Husband Wife trending Video watch now)

इमानुएली बेलिनी ही या स्पर्धेची मानकरी ठरली. अंतिम स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा केल्यानंतर नॅथली आणि बेलिनी यांनी एकमेकांना गळाभेट करत शुभेच्छा दिल्या. विजेत्याचा डोक्यावर मुकुट घालणारच तेवढ्याच स्टेजवर नॅथलीचा नवरा रागारागा आला आणि त्याने मुकुट हिसकावून जमिनीवर जोरदार आपटला. 

एवढंच नाही तर पत्नीला तो स्टेजवरुन ओढून घेऊन जाताना दिसला. त्याचा संताप एवढ्या वाढला होता की, त्याने परत तो मुकुट उचला आणि जोरदार स्टेजवर आपटला. त्यानंतर स्पर्धेतील सुरक्षारक्षक यांनी त्याला स्टेजच्या मागच्या बाजूला नेले. त्याचा या कृत्यामुळे इतर स्पर्धेक घाबरले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. जून महिना Pride Month म्हणून ओळखला जातो. यामागचा उद्देश म्हणजे LGBTQ लोकांना समर्थन दर्शविण्यासाठी साजरा केला जातो. अशामध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावर यूजर्सचं लक्ष वेधून घेतं आहे. 

हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर व्हायरल होतो आहे. Bruno Guzzo या ट्वीटर अकाऊंट आणि sachkadwahai या इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.