India-China standoff : रशियात भारत-चीन संरक्षण मंत्र्यांमध्ये दीर्घ चर्चा

रशियामध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री जनरल वुई फेंगे यांच्यात दीर्घ चर्चा

Updated: Sep 5, 2020, 07:05 AM IST
India-China standoff  : रशियात भारत-चीन संरक्षण मंत्र्यांमध्ये दीर्घ चर्चा  title=

मास्को : भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असताना, रशियामध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री जनरल वुई फेंगे यांच्यात शुक्रवारी रात्री चर्चा झाली. लडाख भागात उभय देशांदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर, दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पहिल्यांदाच अशी चर्चा झाली. तब्बल सव्वा दोन तास ही बैठक सुरू होती. 

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये सुरू असलेल्या या बैठकीत संरक्षण सचिव अजय कुमार आणि रशियातील भारतीय राजदूत डी. बी. व्यंकटेश वर्मा देखील सहभागी झाले होते. याआधी गलवान खोऱ्यातील चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती.

पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) तीव्र तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगे यांनी शुक्रवारी रशियाची राजधानी मॉस्को येथे शुक्रवारी रात्री भेट घेतली. ही बैठक २ तास २० मिनिटे चालली, असे संरक्षण मंत्रालयाने ट्विट केले.

"रक्षा मंत्री श्री. राजनाथ सिंह आणि मॉस्को येथे चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंगे यांच्यातील बैठक संपली. बैठक २ तास आणि २० मिनिटे चालली," असं ट्विटमध्ये लिहिलं आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही चर्चा होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्व लडाखमध्ये सीमा वाद वाढल्यानंतर उभय देशांमधील ही पहिली उच्चस्तरीय बैठक आहे. यापूर्वी, व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या चिनी समकक्ष वांग यी यांच्याशी सलग दूरध्वनीवरून चर्चा केली होती.