कुलभूषणच्या पत्नीला एकटं पाकमध्ये पाठवण्यास भारताचा नकार

पाकिस्ताननं गुप्तहेरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आईला आणि पत्नीला पाकिस्तानात जाण्याची इच्छा आहे. परंतु, भारत सरकार मात्र कुलभूषण यांच्या पत्नीला एकटं पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही. 

Updated: Nov 21, 2017, 11:37 AM IST
कुलभूषणच्या पत्नीला एकटं पाकमध्ये पाठवण्यास भारताचा नकार title=

नवी दिल्ली : पाकिस्ताननं गुप्तहेरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आईला आणि पत्नीला पाकिस्तानात जाण्याची इच्छा आहे. परंतु, भारत सरकार मात्र कुलभूषण यांच्या पत्नीला एकटं पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही. 

पाकिस्तानच्या समोर झुकणं भारताला मान्य नाही. भारत सरकार जाधव यांच्या आईकडून पाकिस्तानला केलेल्या विनंती अर्जावर पाकिस्तानच्या औपचारिक प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. यामध्ये भारत जाधव यांच्या पत्नीला एकटं पाकिस्तानात पाठवण्यास तयार नसल्याचं म्हटलंय. जाधव यांची आईही पाकिस्तानात आपल्या मुलाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, १० नोव्हेंबर रोजी इस्लामाबादच्या एका चॅनलनं जाधव यांच्या पत्नीला त्यांची भेट घेण्याचा प्रस्ताव दिला होता.परंतु, आईच्या भेटीवर मात्र चुप्पी साधली होती. पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्यावर गुप्तहेरीचा आरोप ठेऊन फाशीची शिक्षा सुनावली होती...  त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्टात या निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय. पाकिस्ताननं गेल्या वर्षी जाधव यांना इरानी पोर्टमध्ये अटक केली होती.