Russia Ukraine War : असाल तसे, मिळेल त्या माध्यमातून युक्रेन सोडा; भारतीयांना इशारा

ही सर्व परिस्थिती आणि एकंदरच चिघळलेलं युद्ध पाहता भारतीय दुतावासानं पुन्हा एकदा युक्रेनमध्ये असणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे.

Updated: Oct 26, 2022, 07:02 AM IST
Russia Ukraine War : असाल तसे, मिळेल त्या माध्यमातून युक्रेन सोडा; भारतीयांना इशारा  title=
Indian Embassy Issues Fresh Advisory for Citizens Saying Leave Ukraine Immediately

Russia Ukraine war updates : दर दिवसागणिक रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine war) स्फोटक वळण घेताना दिसत आहे. जिथं युद्ध आतातरी संपेल अशी अपेक्षा केली जात असताना पुन्हा एकदा युद्धानं हिंसक वळण घेतलं आहे. रशियाकडून सातत्यानं युक्रेनवर क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. ही सर्व परिस्थिती आणि एकंदरच चिघळलेलं युद्ध पाहता भारतीय दुतावासानं पुन्हा एकदा युक्रेनमध्ये असणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे.

19 ऑक्टोबरनंतर आता पुन्हा एकदा युक्रेनमध्ये असणाऱ्या भारतीय दुतावासानं (Indian Embassy) नागरिकांना इशारा देत असाल त्या परिस्थितीत आणि मिळेल त्या साधनाने देश सोडा, असा इशारा दिवा आहे. दुतावासाच्या पहिल्या इशाऱ्यानंतर काही नागरिकांनी देश सोडला होता. पण, काही नागरिक अद्यापही युक्रेनमध्ये आहेत. त्यांचा जीव वाचवण्यासाठी म्हणून हा इशारा पुन्हा एकदा नव्यानं देण्यात आला आहे.

युक्रेनमध्ये तुमच्या ओळखीतलं कुणी असल्यास किंवा युक्रेमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी (Indian Citizens) 380933559958, 380635917881, 380678745945 हे Helpline Numbers जारी करण्यात आले आहेत.

अधिक वाचा : पंतप्रधान होताच ऋषी Sunak अ‍ॅक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना पहिला दणका

दूरध्वनी क्रमांकांव्यतिरिक्त भारतीय दुतावासाच्या संकेतस्थळावरही आवश्यक माहिती देत नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर येत्या काळात भारतीय नागरिकांनी युक्रेनमध्ये येऊ नये असाही इशारा दुतावासाकडून देण्यात आला आहे.

सध्याच्या घडीला युक्रेनवर रशियाकडून ड्रोन हल्ले (Drone Attacks) करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच रशियानं युक्रेनवर कामिकेज ड्रोन लाँच करत पॉवर हाऊसवर हल्ला केला होता. रशियाकडून केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये अनेक युक्रेनियन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी देशातील वीज केंद्रांना निशाण्यावर घेतलं जात असल्याची माहिती दिली. तिथे पुतीनही युद्धातून माघार घेण्यास तयार नसल्यामुळे आता अण्वस्त्र युद्ध (Nuclear weapon war) दूर नाही, अशा शब्दांत संपूर्ण जग भीती व्यक्त करत आहे.