भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले...

UK Gurdwara row : ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना काही कट्टरवाद्यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास रोखल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. हा मुद्दा ब्रिटनचे परराष्ट्र कार्यालय आणि पोलिसांकडेही मांडण्यात आलाय.

नेहा चौधरी | Updated: Oct 1, 2023, 07:31 AM IST
भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले... title=
indian high commissioner to uk vikram doraiswami stopped entering gurdwara video trending news

UK Gurdwara row video : भारत कॅनडा तणावादरम्यान ब्रिटनमध्ये खलिस्तान समर्थकांच्या धक्कादायक कृत्याने भारतीयांसोबत जगाला धक्का बसला आहे. काही खलिस्तानींनी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना ग्लासगोमधील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कारमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दोराईस्वामी यांना तिथून निघून जावं लागलं. याप्रकरणी भारताने ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालय आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. (indian high commissioner to uk vikram doraiswami stopped entering gurdwara video trending news)

भारत सरकारने भारतीय उच्चायुक्तांची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केलीय. गुरुद्वाराच्या निमंत्रणावरून भारतीय उच्चायुक्त दोराईस्वामी तिथे गेले होते. शीख कट्टरपंथीयांच्या वागणुकीविरोधात तक्रार करताना भारताने म्हटलंय की हा संपूर्ण मुद्दा शीख समुदायाच्या विरोधात आहे असं मानत नाही, परंतु तो फक्त शीख समुदायातील काही कट्टरवाद्यांचा मुद्दा मानतो.

दरम्यान ब्रिटनच्या इंडो-पॅसिफिक मंत्री (british minister) अ‍ॅनी-मेरी ट्रेव्हलियन यांनी भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्यासोबत झालेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्ती केली आहे. ते म्हणाले की, परदेशी मुत्सद्दी आणि यूकेमधील प्रार्थनास्थळं सर्वांसाठी खुली असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. 

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, दोराईस्वामी यांना गुरुद्वाराच्या समिती बैठकीत जाण्यापासून रोखणे ही चिंताजनक घटना आहे. परदेशी मुत्सद्दींची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून यूकेमधील प्रार्थनास्थळे सर्वांसाठी खुली आहेत. 

खलिस्तान समर्थक शीख कार्यकर्त्याने दावा केला की 'ब्रिटनमधील कोणत्याही गुरुद्वारामध्ये भारतीय अधिकाऱ्यांचं स्वागत होणार नाही.' या घटनेचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतीय उच्चायुक्तांना लंगर देण्यासाठी पांढऱ्या टेबलक्लॉथने घातलेले टेबलही दृश्यमान केले आहेत. खलिस्तान समर्थक कार्यकर्त्याचं गुरुद्वारा समितीच्या सदस्यासोबत भांडण करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अलीकडेच त्यांच्या संसदेत भारतावर अवमानकारक आरोप केल्याची बाब समोर आली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आणि आपल्यावर 'विश्वासार्ह आरोप' असल्याचं सांगितलं. तर भारताने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत ह्यूने यांचं वक्तव्य बेताल आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हटलं या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे.