स्पेन हल्ल्यात या भारतीय वंशाच्या अभिनेत्रीने फ्रीझरमध्ये लपून वाचवला जीव नाहीतर...

गुरूवारी स्पेनमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये लंडनच्या आणि मूळ भारतीय असलेल्या एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने हॉटेलच्या फ्रीजरमध्ये लपून आपला जीव वाचवला आहे.

Updated: Aug 19, 2017, 12:17 PM IST
स्पेन हल्ल्यात या भारतीय वंशाच्या अभिनेत्रीने फ्रीझरमध्ये लपून वाचवला जीव नाहीतर...  title=

मुंबई : गुरूवारी स्पेनमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये लंडनच्या आणि मूळ भारतीय असलेल्या एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने हॉटेलच्या फ्रीजरमध्ये लपून आपला जीव वाचवला आहे.

४६ वर्षीय लैला रूआस असे या अभिनेत्रीचे नाव आहे. 

लैला आपल्या १० वर्षीय मुलीसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बार्सिलोनामध्ये आली होती. हल्ल्याच्या ठिकाणाहून या अभिनेत्रीने लाईव्ह ट्विट केले होते.  

 

लैलाने ट्विटमध्ये लिहले की, 'हल्ल्यादरम्यान मी रेस्ट्रॉरंटच्या फ्रीझरमध्ये लपली आहे. इथे सारेच वेगाने घडत आहे. इथे असलेल्या सार्‍यांच्याच सुरक्षेसाठी मी प्रार्थना करते.  

बार्सिलोनामध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामधील लोकांमध्ये अमेरिका,ब्रिटन, चीन, पाकिस्तान समवेत अनेक देशांच्या लोकांचा समावेश आहे. या हल्ल्यातील पिडीतांमध्ये लहान मुलांची  संख्या अधिक आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. 

लैला रूआस ही ब्रिटेन मध्ये लोकप्रिय टेलिव्हिजन स्टार आहे. ‘फुटबॉलर्स’,'वाईव्स’आणि ‘होल्बी सिटी’हे शो  केले आहेत. रूआसचे वडील मोरक्केचे आणि आई भारतीय आहे.