Interesting News : हिटलरच्या नाकावर टिच्चून काम करणाऱ्या 'या' भारतीय वंशाच्या महिला गुप्तहेर कोण, माहितीये?

दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान ब्रिटनसाठी जर्मनीत गुप्तहेरी करणाऱ्या नूर यांची 13 सप्टेंबर 1944 ला नाझींकडून हत्या करण्यात आली होती. 

Updated: Sep 15, 2022, 03:50 PM IST
Interesting News : हिटलरच्या नाकावर टिच्चून काम करणाऱ्या 'या' भारतीय वंशाच्या महिला गुप्तहेर कोण, माहितीये?  title=
Noor Inayat Khan

Indian female spy : Detective, Spy अर्थात गुप्तहेर, त्यांची काम करण्याची पद्धत या साऱ्यावर बरेच चित्रपट आणि कलाकृती साकारण्यात आल्या. त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला. भारतातही असे अनेक गुप्तहेर झाले, ज्यांची जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती. गुप्तहेरांच्या या यादीत महिलाही मागे नाहीत. आज आपण एका अशाच गुप्तहेर महिलेविषयी जाणून घेणार आहोत, जिच्यामुळं हिटलरच्या सेनेलाही धडकी भरत होती. 

भारतीय वंशाच्या या ब्रिटिश गुप्तहेर महिलेचं नाव, नूर इनायत खान (Noor Inayat Khan). दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान ब्रिटनसाठी जर्मनीत गुप्तहेरी करणाऱ्या नूर यांची 13 सप्टेंबर 1944 ला नाझींकडून हत्या करण्यात आली होती. 

मॉस्कोत नूर चा जन्म
नूर यांचा जन्म 1914 मध्ये Russia मधील मॉस्को मध्ये झाला.  नूर इनायत खान (Noor Inayat Khan) या म्हैसूरमधील शासक टीपू सुलतान यांच्या वंशजांपैकी एक होत्या. त्यांचे वडील हजरत इनायत खान टीपू सुलतान यांचे पणतू होते. नूरची आई ओरा रे बेकर (Ora Ray Baker) मुळच्या अमेरिकन वंशाच्या होत्या. काही काळानंतर त्यांनी स्वत:चे नाव बदलून अमीना शारदा बेगम ठेवले. काही दिवसांनी त्यांचे कुटुंब मॉस्कोतून लंडनला आले. जिथे नूर एक स्वयंसेवक (Volunteer) म्हणून ब्रिटिश सेनेत सहभागी झाल्या. 1943 साली,  ब्रिटिश सेनेत त्या एक सिक्रेट एजेंट म्हणून सेवेत रुजू झाल्या.

नूर यांना तिथे (Noor Inayat Khan) एका रेडियो ऑपरेटरप्रमाणे प्रशिक्षण दिले. दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान जून 1943 ला नूर यांना ब्रिटन आणि फ्रान्सकडून नाझींची गुप्तहेरी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. अभियान सोपे नव्हते, कारण त्यात अपयशी ठरल्यास आणि शत्रूच्या हाती लागल्यास गुप्तहेरांना पकडल्यानंतर  कायमस्वरुपी बंदी बनवले जात होते. पण नूर यांनी पॅरिसमध्ये तीन महिन्यांहून अधिक काळ गुप्तपणे संचार करत यशस्वीरित्या नाझींची माहिती ब्रिटनपर्यंत पोहचवली. 

(Interesting News Who is this female spy of Indian origin working under Hitler nose)

...आणि 1943 मध्ये नूर फसल्या
1943 ऑक्टोबरमध्ये नूर फसल्या. एका सहकाऱ्याच्या बहिणीने नूर यांच्या सौंदर्यावर असणाऱ्या ईर्ष्येतून नाझींना त्यांच्या या कामाची माहिती दिली. काही दिवसांनंतर पॅरिसमधील जर्मन सिक्रेट पोलीस गेस्टापोने 13 ऑक्टोबर 1943 ला एका अपार्टमेंटमधुन नूरला अटक केले. अटक केल्यानंतर ब्रिटिश गुप्तचर कारवायांविषयी माहिती मिळवण्यासाठी नूर यांचा प्रचंड छळ करण्यात आला.
असे सांगण्यात येते की, जर्मनीला गुप्तहेर नूर (Noor Inayat Khan) यांचे खरे नाव देखील माहित करता आले नाही. त्यांना हेसुद्धा कधीच कळू शकले नाही की, नूर ही खरंच भारतीय वंशाच्या होत्या की नाही. 

कैद्याच्या रुपात एक वर्ष घालवल्यानंतर नूर यांना जर्मनीच्या एका एकाग्रता शिबिरात पाठवण्यात आले. 13 सप्टेंबर 1944 ला नाझींनी नूर यांना इतर 3 महिला गुप्तहेरांसोबत गोळ्या झाडत त्यांची हत्या करण्यात आली. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय अवघी 30 वर्षे होते. नूर यांनी अखेरच्या क्षणी भारताच्या स्वातंत्र्याचा नारा दिला असा ब्रिटिश इतिहासात उल्लेख मिळतो. 

ब्रिटन-फ्रान्सने दिले सर्वोच्च नागरी सन्ममान
दुसऱ्या महायुद्धात नूर (Noor Inayat Khan) यांनी इतकी महत्त्वाची भूमिका बजावली होती, की मृत्यूनंतर फ्रान्सने सर्वोच्च नागरी सम्मानाने,  Croix de Guerre (क्वा डी गेयर) पुरस्कृत केले. तर ब्रिटनने नूर यांना १९४९ मध्ये मरणोत्तर जॉर्ज क्रॉस (George Cross) बहाल केले. 2012ला लंडनमध्ये नूर यांचा (Noor Inayat Khan) धातूचा पुतळा उभारण्यात आला. ब्रिटनमध्ये मुस्लीम किंवा आशियाई महिलेचा पुतळा बसवण्याची ही पहिलीच वेळ होती. हा पुतळा नूर यांच्या घराजवळच आहे, जिथे त्यांचे बालपणीचे आयुष्य व्यतीत झाले होते. नूर (Noor Inayat Khan) 2014 च्या शताब्दी वर्षात, ब्रिटनच्या रॉयल मेलने नूर इनायत खान यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट देखील जारी केले.

नूर दुसऱ्या महायुद्धादरम्यान, गुप्तहेर कशा झाल्या? जाणून घेऊया 
नूरचे वडील हज़रत इनायत ख़ान यांनी भारताच्या सूफ़ीवाद या संगीताला पाश्चात्य देशांपर्यंत पोहचवले. नूर या एक राष्ट्रवादी महिला होत्या. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभावही होता. नूर स्वांतत्र्य भारताचे स्वप्न पाहायच्या. ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधक असूनही, त्यांनी ब्रिटनसाठी गुप्तहेरी केली आणि एक आदर्शही ठेवला. कारण तिचा विश्वास होता की ब्रिटनने आपल्या कुटुंबाला आश्रय दिला आहे, त्यामुळे तिला ब्रिटनसाठी काहीतरी करावेसे वाटले.
नूर यांनी एक स्वप्न पाहिले होते की, दुसऱ्या विश्वयुद्धात सहभागी झालेल्या भारतीय सैनिकांपैकी काही सैनिकांना ब्रिटिश सैन्य सन्मान जाहिर झाला पाहिजे त्यामुळे युद्धात भारतीय सैनिकांची वीरता कायम लक्षात राहील. याच विचाराने झपाटून निघालेल्या नूर यांनी ब्रिटिश गुप्तहेर व्हायचा निर्णय घेतला होता. त्यांना ब्रिटनमधील नागरिक पहिली WAR HEROINE म्हणून देखील ओळखतात. आजही लोक त्यांच्या कर्तव्यासाठी त्यांचे स्मरण करतात.