पॉर्न क्वीन म्हणून ओळखली जाणारी स्टार आज गंभीर आजाराने ग्रस्त

पॉर्न क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज, चालण्यासाठी उरले नाहीत त्राण

Updated: Jan 12, 2022, 07:13 PM IST
पॉर्न क्वीन म्हणून ओळखली जाणारी स्टार आज गंभीर आजाराने ग्रस्त title=

वॉशिंग़्टन : एकेकाळी अमेरिकन अडल्ट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखली जाणारी स्टार अभिनेत्री गंभीर आजाराशी झुंज देत आहे. या अभिनेत्रीचं नाव जेना जेमसन आहे. ती सध्या अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे. तिला एका दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे.

या आजारामुळे तिला नीट चालणे शक्य होत नाही. पॉर्न स्टार जेनाला सध्या असा दुर्धर आजार असल्याचं समोर आलं आहे. या आजारामुळे तिच्या शरीरातील नसा कमकुवत झाल्या आहेत. जेनाच्या पतीने सोशल मीडियावर याची माहिती दिली. 

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, जेना जेमसनला Guillain-Barre Syndrome हा आजार आहे. या आजारामुळे गेल्या काही दिवसांपासून नीट चालता येत नव्हतं. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिथे झालेल्या चाचण्यांमध्ये हा अत्यंत दुर्मीळ आजार असल्याचं समोर आलं. 

Guillain-Barre Syndrome हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये नसा हळूहळू कमकुवत होत जातात. जेनाला एकेकाळी अमेरिकेत अडल्ट इंडस्ट्रीमधील क्वीन म्हटलं जात होतं. 

सध्या जेना पूर्णपणे बेडला खिळली आहे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. जेनाचा पार्टनर लियोर बिटन याने देखील याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. जेनाला 4 वर्षांची गोंडस मुलगी आहे. 

लियोर बिटनच्या म्हणण्यानुसार जेनाला जागचं उठताही येत नाही. तिने हालचाल करुन उठण्याचा प्रयत्न केला तर ती खाली कोसळते. तिला अजिबात चालता देखील येत नाही. 

Guillain-Barre Syndrome हा आजार नेमका काय? 

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने या आजारची माहिती दिली आहे. हा आजार एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.Guillain-Barre Syndrome ची लक्षणे प्रथम पाय आणि हातांमध्ये दिसतात. त्याच्या मुख्य लक्षणांमध्ये सुन्न होणे, काटे येणे, स्नायू कमकुवत होणे, वेदना, संतुलन आणि समन्वयात समस्या जाणवतात. 

इम्युनिटी सिस्टिममध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे देखील हा आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरीर रोग आणि संसर्गाशी लढण्यात अडथळे येतात. त्यामुळे प्रकृती आणखी खालवत जाते असंही सांगितलं जातं.