Job News : खरंखुरं जेम्स बॉण्ड होण्याची संधी; लाखोंच्या पगाराची नोकरी तुम्हालाही हवीये का?

Job News : नोकरी मिळते त्या क्षणी आपला आंद गगनाच मावेनासा असतो. पण, त्यानंतर जसजसं आपण नोकरीत रमतो आणि काही वर्ष उलटतात तेव्हा मात्र काहीतरी नवं करण्याची इच्छा होते....   

सायली पाटील | Updated: Sep 18, 2023, 11:07 AM IST
Job News : खरंखुरं जेम्स बॉण्ड होण्याची संधी; लाखोंच्या पगाराची नोकरी तुम्हालाही हवीये का?  title=
job news chance to get a real life james bond job know updates

Job News : तुम्ही कधी एक गोष्ट लक्षात घेतलीये का, की आपल्याला कायमच दुसऱ्याचीच नोकरी आवडत असते. 'कसलं भारी ना... त्यांना अमुक एक सुविधा, तमुक एक संधी', असं म्हणत आपण कायमच दुसऱ्याच्या नोकरीचं कौतुक करत असतो. कारण, आपल्या आयुष्यात असणारा तोचतोचपणा आता रटाळ वाटू लागलेला असतो. तुम्हीही अशाच एका तूफानी नोकरीच्या शोधात आहात का? 9 ते 12 तास एकाच ठिकाणी बसून काम करण्याच्या साचेबद्ध नोकरीचा तुम्हालाही कंटाळा आलाय का? आता हा कंटाळा झटका. 

आता एखाद्या चित्रपटाप्रमाणंच तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. कारण, James Bond सारख्या चित्रपटाचील थरार तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार युनायटेड किंग्डममध्ये सर्वसामान्य नागरिकांना हेर बनण्याची संधी दिली जात आहे. यासाठी त्यांना जवळपास 6 लाख रुपये आणि त्याहून जास्तीचा पगारही दिला जात आहे. बरं, या सुविधा इथंच संपत नाहीत. तर, ही नोकरी करणाऱ्यांच्या राहण्याची सोय, क्यांच्या खाण्यापिण्याची सोय हे सर्वकाही कंपनीच करणार आहे. 

आता संधी James Bond होण्याची... 

MI6 सारख्या एजन्सी सध्या Full Time Internship देत आहेत. नोकरीचं ठिकाण असेल लंडन. 11 आठवडे म्हणजेच साधारण 3 महिन्यांसाठी ही नोकरी करता येणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 17 जून ते 30 ऑगस्टपर्यंत या नोकरीचा कालावधी असेल. ज्यासाठी उमेदवारांना 5 लाख 86 हजार आणि त्याहून जास्तीचाही पगार दिला जाऊ शकतो. या नोकरीमध्ये दिवसाला 8 तासांचं काम करणं अपेक्षित असून, ताशी £12.90 म्हणजेच 1300 रुपये इतका पगार दिला जाईल. 

हेसुद्धा वाचा : Anantnag Encounter Latest Update : अनंतनागमध्ये लष्कराला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात अद्यापही यश का मिळालं नाही? 

 

GCHQ च्या या इंटर्नशिपदरम्यान तुम्हाला उत्तमोत्तम गुप्तहेर मोहिमांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. सायबर, डेटा साईंटीस्ट, कोडिंगचा अनुभव असणाऱ्यांसाठी ही नोकरी लाखामोलाची ठरणार असून, यामुळं युवा वर्गाच्या करिअरला कलाटणी मिळणार आहे.