Success Story : KFC मध्ये काम करणारा 24 वर्षाचा तरुण बनला करोडपती; पण बढाया ऐवढ्या मारल्या की...

KFC मध्ये काम करणाऱ्या सेबॅस्टियन ग्योर्क याने पहिली कमाई 700 रुपये केली. अवघ्या सहा वर्षात तो करोडपती झाला आहे. 

Updated: Jan 25, 2023, 03:53 PM IST
Success Story : KFC मध्ये काम करणारा 24 वर्षाचा तरुण बनला करोडपती; पण बढाया ऐवढ्या मारल्या की... title=

Inspirational Story : यश मिळवण सोप असतं. पण मिळालेल यश टिकवूण ठेवण खूप कठीण असतं.  KFC मध्ये काम करणारा 24 वर्षाचा तरुण जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर करोडपती बनला आहे. फक्त सहा वर्षात त्याने ही कोट्यावधीची कमाई केली आहे. या कामाईतून त्याने महागडी Lamborghini कार खरेदी केली आहे. पण, करोडपती झाल्यानंतर हा तरुण इतक्या बढाया मारत आहे की तो सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.  सेबॅस्टियन ग्योर्क ( वय 24 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे.

सेबॅस्टियन हा अमेरिकेतील डेट्रॉईट येथे राहणारा आहे. सेबॅस्टियनने गेल्या वर्षी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने त्याच्या करिअरबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. यानंतर त्याने त्याचा कमाई देखील जाहीर केला. 

पहिली कमाई 700 रुपये

सेबॅस्टियनची पहिली कमाई 700 रुपये होती. शाळेत असताना सेबॅस्टियन  KFC आणि TacoBell सारख्या रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. इथे काम करताना त्याला दिवसाला 700 रुपये मिळायचे. त्याने कार सफाईचे  देखील काम केले. याशिवाय त्याने कार खरेदी-विक्रीही केली होती. वयाच्या 19 व्या वर्षी माझी एकूण संपत्ती 65 लाखांच्या पुढे गेली होती असा दावा सेबॅस्टियनने केला होता.

सेबॅस्टियन कसा बनला करोडपती

सेबॅस्टियन सध्या करोडींची कमाई करत आहे. सहा वर्षात सेबॅस्टियनने विविध स्रोतांमधून 65 कोटींहून अधिक कमाई केली आहे. डेलीस्टार, गुगल अॅड,  घरांची खरेदी-विक्री आणि यूट्यूब व्हिडिओ याच्या माध्यमातून सेबॅस्टियन करोडींची कमाई करत आहे .  सेबॅस्टियनचे YouTube वर 8 लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. याशिवाय ड्रॉपशिपिंग कंपन्यांच्या माध्यमातूनही तो लाखोंची कमाई करत आहे. त्याने नुकतीच Lamborghini कार खरेदी केली आहे.

सेबॅस्टियन का होतोय ट्रोल?

सेबॅस्टियन सध्या त्याच्या एका पॉडकास्ट एपिसोडनंतर ट्रोल होऊ लागला आहे. या पॉडकास्ट व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या Lamborghini कारबद्दल सांगितले आहे. प्रत्येक पुरुषाने Lamborghini कार खरेदी केली पाहिजे. जर तुमचे वय 20 ते 25 दरम्यान आहे. तर तुमच्याकडे लेम्बोर्गिनी कार असलीच पाहिजे. तुम्ही स्वत:ला हा प्रश्न केला पाहिजे की माझ्याकडे  Lamborghini  कार का नाही? या कारची किंमत फक्त दीड कोटी आहे. दीड कोटी ही अत्यंत किरकोळ रक्कम आहे असं सेबॅस्टियन म्हणाला यावरुनच तो ट्रोल झाला आहे.