Khaby Lame कोण आहे? त्याच्या आयुष्यातील 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

 सोशल मीडिया स्टार बद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. जो त्याच्या वेगळेपणामुळे आज जगभरात ओळखला जातो. 

Updated: Aug 23, 2021, 09:43 AM IST
Khaby Lame कोण आहे? त्याच्या आयुष्यातील 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? title=

मुंबई : सोशल मीडिया आजकाल प्रत्येक व्यक्ती वापरतो. आपण त्या प्लॅटफोर्मला आपलं मनोरंजन करण्यासाठी वापतो, जसे की, मित्रांसोबत गप्पा मारणे, व्हिडीओ पाहाणे, मीम्स पहाणे आणि बरच काही. सोशल मीडियावर अनेक ट्रेंड बनतात, ज्याला एका रात्रीत जगभरात प्रसिद्धी मिळते. त्याचबरोबर असे अनेक लोकं आहेत. ज्यांना जगभरात ओळखले जाते आणि त्यांचे अनेक फॉलेअर्स आहेत. परंतु आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नसते.

अशाच एका सोशल मीडिया स्टार बद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. जो त्याच्या वेगळेपणामुळे आज जगभरात ओळखला जातो. त्या व्यक्तिचे नाव आहे, खेबी लेम (Khaby Lame). हा तोच व्यक्ती आहे, जो त्याच्या व्हिडीओच्या माध्यमातून सगळ्यांना कृतीतून सोल्यूशन देतो.

त्याच्या व्हिडीओची स्पेशालिटी ही आहे की, तो एक शब्द ही न बोलता त्याच्या कृतीतून खूप काही बोलून जातो. जसे की, एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत असेल. तर त्या व्हिडीओत लोकं आपला काही ना काही झुगाड करत असतील. तर खेबी लेम (Khaby Lame)हा एकदम सोप्या कृतीतून सोपा उपाय दाखवतो.

उदाहरण द्यायचं झालं तर एका व्हिडीओमध्ये काही लोकं मोठा टिव्ही कारमध्ये ठेवण्याचे प्रयत्न करत असतात परंतु त्यांच्या अनेक प्रयत्नानंतर देखील त्यांना टीव्ही कारमध्ये ठेवता येत नाही मग ते कारच्या मागे टीव्हीला बांधून घासत घेऊन जातात. परंतु नंतर खेबी लेम (Khaby Lame) त्यावरती एक सोपा उपाय दाखवतो की, कारची मागची सिट पुढे केली की, टीव्ही ठेवायला जागा मिळते. म्हणजे थोडक्यात काय तर डोकं लावून काम केलं तर सगळं काही शक्य आहे.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना खेबी लेम (Khaby Lame) ची ही वेगळी शैली पाहायला आवडते. परंतु आपल्यापैकी खूपच कमी लोकांना त्याच्या आयुष्याबद्दल माहित असेल. खेबी लेम (Khaby Lame) कुठून आहे? आणि तो काय करतो? त्याचं आयुष्य कसं आहे? तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.

खेबी लेम (Khaby Lame) हा फक्त 21 वर्षाचा आहे जो यापूर्वी फॅक्ट्रीमध्ये एक मजूर म्हणून काम करायचा. नंतर त्याच्या कॉमिक करण्याच्या स्टाइलमुळे त्याने लोकांना हसवायला सुरूवात केली, त्यानंतर जगभरातून त्याचे चहाते वाढू लागले. टिक टॉकवर 100 मिलियन फॉलेअर्स आहेत आणि मोठा चाहता वर्ग असलेला हा तरुण चित्रपट अभिनेता किंवा क्रिकेटपटू नाही, तर एक सामान्य माणूस आहे, जो काही काळापूर्वी फक्त एका कारखान्यात काम करायचा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टिकटॉकशिवाय खेबी लेम (Khaby Lame) इंस्टाग्रामवरही लाखो चाहते आहेत. इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर खेबीचे 36.3 मिलीयन फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर देखील त्याला लोकं फॉलो करतात. विदेशातच काय तर भारतात देखील खेबी लेम (Khaby Lame)चे लाखो चहाते आहेत.