Viral Video थरकाप उडवणारा, धावत्या कारवर पडली वीज आणि... पुढे काय घडलं पाहा

जो काही सेकंदासाठी का होईना, तुमच्या काळजाचा ठोका चुकतो, असा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

Updated: Jul 8, 2022, 06:10 PM IST
Viral Video थरकाप उडवणारा, धावत्या कारवर पडली वीज आणि... पुढे काय घडलं पाहा title=

मुंबई - सोशल मीडियावर धक्कादायक, थरारक असे व्हिडीओ पाहिल्या मिळतात. असाच एक व्हिडीओ मोठ्या संख्येने सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. जो काही सेकंदासाठी का होईना, तुमच्या काळजाचा ठोका चुकतो, असा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये धावत्या गाडीवर वीज कोसळते. ही घटना अमेरिकामधील फ्लोरिडामधील आहे. 

भरपावसात एक व्यक्ती गाडीतून त्याचा तीन मुलांसोबत प्रवास करत असतो. त्या गाडीच्या मागच्या गाडीत त्या व्यक्तीची पत्नी प्रवास करत असते. ती नवऱ्याचा गाडीचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत असते आणि तेव्हा ती जे काही पाहते, ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते.

हा व्हिडीओ पाहून काही क्षणासाठी तुम्ही निशब्द व्हाल. आपण वीज कोसळतानाचे अनेक व्हिडीओ बघितले असेल, ज्यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by UNILAD (@unilad)

परंतु नशीबाने या गाडीतील लोकांना काहीही झालं नाही. त्यामुळे असंच म्हणावं लागेल की, या गाडीतील चौघांनी मृत्यूलाच  घरचा रस्ता दाखवला आहे. कदाचित त्या गोंडस मुलांना पाहून यमराजालाही त्यांची दया आली असावी असंच म्हणावं लागेल.