वाह रे नशीब! फक्त 14 दिवसात 22 कोटींचा बनला मालक; काय केलं त्याने असं वाचा

आयुष्यात काहीही होऊ शकतं. आणि काही गोष्टी अचानक एका झटक्यात होतात. सर्वच जणांचे नशीब एकसारखे नसते. काहींच्या नशीबात श्रीमंतपणा असतो तर काहीच्या नशीबी दरिद्रीपणा.

Updated: Aug 14, 2021, 11:49 AM IST
वाह रे नशीब! फक्त 14 दिवसात 22 कोटींचा बनला मालक; काय केलं त्याने असं वाचा  title=

न्यूयॉर्क : आयुष्यात काहीही होऊ शकतं. आणि काही गोष्टी अचानक एका झटक्यात होतात. सर्वच जणांचे नशीब एकसारखे नसते. काहींच्या नशीबात श्रीमंतपणा असतो तर काहीच्या नशीबी दरिद्रीपणा! परंतु नशीबाचा खेळ पहा. अमेरिकेतील एक व्यक्ती इतका नशीबवान निघाला की 14 दिवसात त्याचे नशीब बदलले.

दोन आठवड्यात जिंकले 3 मिलिअनचे जॅकपॉट
युपीआयच्या वृत्तानुसार ही घटना अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिनाची आहे.  एका व्यक्तीला दोन आठवड्यात 2 वेळा लॉटरी लागली आहे. पहिल्या आठवड्यात 40 हजार डॉलर म्हणजेच 29 लाख 70 हजाराची लॉटरी त्याने जिंकली. लगेचच दुसऱ्या आठवड्यातही 3 मिलियन डॉलर म्हणजेच 22 कोटी 27 लाखांचा जॅकपॉट त्यानं जिंकला. छप्परफाड पैसा आणि नशीबवान म्हणतात ते यालाच...

जेव्हा दुसऱ्या वेळेस नशीब फळफळले
या नशीबवान व्यक्तीने साऊथ कॅरोलिना एज्युकेशन लॉटरीच्या अधिकाऱ्यांशी बोलताना म्हटले की, मी 40 हजार डॉलरचा मेगा मिलिअन्स पुरस्कार जिंकून भाग्यशाली ठरलो.  त्या आनंदात असताना 27 जुलै रोजी कारमध्ये इंधन भरण्यासाठी मर्फी यूएसए स्टेशन गेलो. तेथे आणखी एक लॉटरी टिकिट खरेदी केले. त्या लॉटरीतही 3 मिलिनयन डॉलर मिळाले.