घटस्फोटाचं सेलिब्रेशन नडलं! बंजी जंपिंग करायला गेला, दोरी तुटली अन्...

Trending News : घटस्फोटाचं सेलिब्रेशन त्या तरुणाला महागात पडलं. मित्रांसोबत तो बंजी जम्पिंगल करायला गेला. त्याने 70 फूट खोलवर उडी घेतली अन् दोर तुटला मग...

नेहा चौधरी | Updated: May 8, 2023, 09:51 AM IST
घटस्फोटाचं सेलिब्रेशन नडलं! बंजी जंपिंग करायला गेला, दोरी तुटली अन्... title=
Man goes bungee jumping to celebrate divorce falls 70ft after rope snaps in Brazil video viral news

Viral News : आयुष्यातील प्रत्येक क्षणा आनंद आजकाल उत्साहात साजरा करण्याची जनु परंपराच आली आहे. जगण्यासाठी इथे प्रत्येक जण संघर्ष करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यातील लढाई ही वेगवेगळी असते. त्यामुळे माणून छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय. रोजच्या टेन्शन आणि मनस्तापातून शांतेसाठी प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन तो करतो. याची दुसरी बाजू म्हणजे वाढता सोशल मीडियाचा प्रभाव. यामुळे प्रत्येक गोष्टींचं इथे सेलिब्रेशन झालंच पाहिजे. 

गेल्या काही दिवसांमध्ये परदेशातील एका महिलेने घटस्फोटोचं फोटोशूट केल्यानंतर भारतात एका अभिनेत्रीनेही तिच्या घटस्फोटाचे फोटोशूट केलं. गेल्या काही दिवसांपासून ही बातमी सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यात अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (viral vidoe)

अन् घटस्फोटाचं सेलिब्रेशन नडलं!

पत्नीपासून घटस्फोट मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी तो तरुणांनी साहसी खेळाची निवड केली. तो म्हणाला घटस्फोटानंतर मला आयुष्यात प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायचा होता. म्हणून मी माझ्या मित्र आणि चुलत भावासोबत ब्रिज स्विंग करायचं ठरवलं. आईने यासाठी विरोधही केला होता. पण मी गेली. (Man goes bungee jumping to celebrate divorce falls 70ft after rope snaps in Brazil video viral news  )

आम्ही बंजी जम्पिंग स्थळी पोहोचली. आता मला दोरी बांधण्यात आली. त्यावेळी मी गंमतीत म्हटलं होतं, ही दोरी माझं वजन घेऊ शकणार नाही. 22 वर्षांचा या तरुणाचं हे वाक्य आणि पुढच्या क्षणात त्याचासोबत भयानक घटना घडली. 

त्याने उडी घेतली अन् दोरी तुटली आणि तो तरुण जवळपास 70 फूट खाली कोसळला. या दुर्घटनेत तरुणाच्या मान आणि कमेरजवळील मणकाला फ्रॅक्चर झाला आहे. या तरुणाचं नाव राफेल डॉस सॅचोस टोस्टा आहे. तो पोर्तुगालचा राहणारा असून तो ब्राझीलच्या ब्यूटी स्पॉटला गेला असताना ही घटना घडली. 

जेव्हा दोरी तुटली तिथल्या उपस्थित सगळ्यांना त्याने जीव गमावला असेच वाटलं. सुरक्षाकर्मी आणि मदत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर त्याला खड्ड्यातून बाहेर काढलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयता दाखल करण्यात आले. 

या दुर्घटनेत त्याला अनेक ठिकाणी मार लागला आहे. या घटनेला तीन महिने उलटूनही तो अजूनही ठिक झालेला नाही. त्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून त्याचा जीव वाचला. राफेलला मानसिक धक्का बसल्याचं त्याने सांगितलं आहे.