युक्रेनमधून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आयोगाने जारी केली सूचना

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांना भारतीयांना दिलासा देणारी बातमी आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी बनले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हणजेच एनएमसीने महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. 

Updated: Mar 5, 2022, 02:25 PM IST
युक्रेनमधून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आयोगाने जारी केली सूचना  title=

मुंबई : युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांना भारतीयांना दिलासा देणारी बातमी आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी बनले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हणजेच एनएमसीने महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. 
 
 परदेशी वैद्यकीय पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अपूर्ण राहिलेली इंटर्नशिप भारतात पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अर्ज करण्याची परवानगी दिलीय. यामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 रशियाच्या हल्ल्यांनी युक्रेनची अनेक शहरं बेचिराख

युक्रेनची जी शहरे घड्याळाच्या काटयांवर चालायची तिथे आता स्मशान शांतता आहे. नजर जाईल तिथे फक्त युद्धाच्या खाणाखुणा दिसतायत. आकांत करणारे, जखमी झालेले, अख्ख कुटुंब उद्धस्थ झालेले लोक दिसतायत. राजधानी कीवपासून 60 किमी असंतावरचं शहर बोरोड्यांकातलं हे अंगावर येणारं दृश्य. युद्ध कधी थांबेल, माहित नाही पण युद्धानं सगळं उद्धवस्थ झालंय हेच सध्याचं सत्य आहे. (Russia Ukraine War)