बापरे, अमेरिकेत कोरोनाचा कहर, बाधितांनी ओलांडला 3 कोटींचा टप्पा; भारताचा तिसरा क्रमांक

अमेरिकेत (USA) कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येने 3 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर भारताही (India) कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.  

Updated: Mar 16, 2021, 07:02 AM IST
बापरे, अमेरिकेत कोरोनाचा कहर, बाधितांनी ओलांडला 3 कोटींचा टप्पा; भारताचा तिसरा क्रमांक title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत (USA) कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येने 3 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्या 3,01, 36,881च्या घरात पोहोचली आहे. तर नवीन कोरोना बाधितांचा आकडा 4 4,331 इतका वाढला आहे. आतापर्यंत 548,001इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 773 नवीन रुग्णांचा समावेश आहे.  worldometers या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, जगात भारताचा तिसरा क्रमांक लागला आहे. भारताही (India) कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

जगाचा विचार करता कोरोनाबाधितांचा (Coronavirus Cases) आकडा 120,761,841 पर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत 2,671,720 इतक्या कोरोनाबाधितांचा मृत्यू (Deaths)झाला आहे. तर कोरोनामुक्त 97,402,129 जण झाले आहेत. अमेरिकेनंतर ब्राझिलचा क्रमांक लागतो. ब्राझिलमध्ये एकूण 11,525,477 कोरोनाबाधित रुग्ण असून यात 42,107 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा 279,602 इतका असून काल 1,275 जणांची भर पडली आहे.

तिसरा क्रमांक भारताचा लागत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारतामध्ये एकूण11,409,524 कोरोनाबाधित रुग्ण असून यात 24,366 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा 158,892 इतका असून काल 130 जणांची भर पडली आहे. चौथा क्रमांक रशियाचा लागतो. रशियात एकूण 4,400,045 कोरोनाबाधित रुग्ण असून यात 9,437 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा 92,494 इतका असून काल 404 जणांची भर पडली आहे. यूकेही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. यूके पाचव्या स्थानावर आहे. यूकेत एकूण 4,263,527 कोरोनाबाधित रुग्ण असून यात 5,089 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा 125,580 इतका असून काल 64 जणांची भर पडली आहे.

प्रगत राष्ट्र म्हणून अमेरिकेकडे पाहिले जाते. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. कॅलिफोर्नियामध्ये सर्वाधिक कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 36 लाख 23 हजार 603 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 55 हजार 813 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 27 लाख 30 हजार 374 जणांना बाधा झाली असून, 46 हजार 697 रुग्ण दगावले आहेत.

अमेरिकेत रविवारी येथे 36 हजार 896 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 629 जणांचा मृत्यू झाला. एकूण 03 कोटी कोरोना रूग्णांपैकी 2 कोटी 21 लाख 69 हजार 237 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर अजूनही 63 लाख 65 हजार 186 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 09 हजार 404 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 38 कोटी 02 लाख 48 हजार 374 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.