पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे विशाल Asteroid, आकार 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' पेक्षा 3 पट मोठा

अमेरिकेची अंतराळ संस्था NASAच्या मते, 2021 NY1 पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या 17 Near-Earth objects पैकी एक आहे. तो प्रति तास 33659 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.

Updated: Sep 2, 2021, 07:27 AM IST
पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे विशाल  Asteroid, आकार 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' पेक्षा 3 पट मोठा  title=
प्रातिनिधिक फोटो

वॉशिंग्टन: NASA News : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे (NASA) शास्त्रज्ञ सतत पृथ्वीवर (Earth) धडकण्याची शक्यता असलेल्या एस्टेरॉयडचा (Asteroid) मागोवा घेत आहेत. हा एस्टेरॉयड (Asteroid) वेगाने पृथ्वीच्या कक्षाकडे वाटचाल करत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या एस्टेरॉयडचा आकार 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा तिप्पट मोठा आहे.

60 दिवसांपासून मागोवा घेत आहेत शास्त्रज्ञ 

नासाने (NASA) सांगितले की, या एस्टेरॉयडचे (Asteroid)  नाव 2021 NY1 आहे, जे पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करू शकते. गेल्या 60 दिवसांपासून शास्त्रज्ञ त्याचा मागोवा घेत आहेत.

अमेरिकेची अंतराळ संस्था NASAच्या मते, 2021 NY1 पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या 17 Near-Earth objects पैकी एक आहे. तो प्रति तास 33659 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.

 पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करू शकतो एस्टेरॉयड 

नासाने सांगितले की 2021 NY1 एस्टेरॉयडचा Diameter 130-300 मीटर आहे तर 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' फक्त 93 मीटर उंच आहे. शास्त्रज्ञांना आशा आहे की एस्टेरॉयड पृथ्वीपासून 1497473 किमी अंतरावरून सुरक्षितपणे जाईल. 22 सप्टेंबर रोजी एस्टेरॉयड पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करू शकतो.

असे 22 एस्टेरॉयड पृथ्वीवर धडकण्याची शक्यता असल्याचे नासाने सांगितले आहे. सध्या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेकडून सुमारे दोन हजार एस्टेरॉयड्सचा मागोवा घेतला जात आहे.

टक्कर होण्याची शक्यता

नासा (NASA) आणखी एका एस्टेरॉयडचा मागोवा घेत आहे. हा एस्टेरॉयड पृथ्वीपासून तीन दशलक्ष मैलांपेक्षा जास्त अंतरावरून जाईल, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या व्यतिरिक्त, नासाच्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी एस्टेरॉयड बेन्नू 2300 पृथ्वीवर आदळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

काय आहे Asteroids?

एस्टरॉइड्स (Asteroids) हे ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती फिरणारे खडक आहेत. परंतु ते आकाराने ग्रहांपेक्षा खूपच लहान आहेत. आपल्या सूर्यमालेतील बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरूच्या कक्षेत Asteroids पट्ट्यात आढळतात. या व्यतिरिक्त, ते इतर ग्रहांच्या कक्षेत फिरत राहतात आणि सूर्याभोवती ग्रहासह फिरतात. सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी, जेव्हा आपली सौर मंडळाची निर्मिती झाली, तेव्हा वायू आणि धूळ असे ढग जे ग्रहाचा आकार घेऊ शकले नाहीत आणि मागे राहिले, ते या खडकांमध्ये (Asteroids) म्हणजेच एस्टरॉइड्समध्ये रूपांतरित झाले. हेच कारण आहे की त्यांचा आकार देखील ग्रहांसारखा गोल नाही. कोणतेही दोन लघुग्रह एकसारखे नसतात.