या रेस्टॉरंटमध्ये चेहरा दाखवा आणि बिल भरा...

चीन : आजकाल सेलिब्रेशनचा जमाना आहे. कोणतीही गोष्ट पार्टी देऊन, हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट केली जाते. साहजिकच  रेस्टॉरंटमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 11, 2017, 05:25 PM IST
या रेस्टॉरंटमध्ये चेहरा दाखवा आणि बिल भरा...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

चीन : आजकाल सेलिब्रेशनचा जमाना आहे. कोणतीही गोष्ट पार्टी देऊन, हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट केली जाते. साहजिकच  रेस्टॉरंटमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी रेस्टॉरंट आपल्याला काही विशेष सुविधा देतात. परंतु, केएफसीने चीनमध्ये एक अनोखा प्रयोग सुरु केला आहे. त्यामुळे तुमची ग्राहक म्हणून ओळख राहील आणि पैसे भरणे देखील सोयीचे होणार आहे. 

त्यासाठी तुम्हाला कोणताही पदार्थ विकत घेताना केवळ एक स्माईल द्यायची आहे. नवल वाटावे असेच हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘स्माईल टू पे’ ही नवीन यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. एका मोठ्या स्क्रीनवर तुमच्या चेहऱ्याची नोंद घेतली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला हवा तो पदार्थ तुम्ही त्याठिकाणी ऑर्डर करु शकता. इंटरनेट बँकींगव्दारे पैसे भरण्याची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे. स्क्रीनवर घेण्यात आलेल्या चेहऱ्याच्या फोटोवरुन तुम्हाला वेटरमार्फत तुमचा पदार्थ आणून दिला जाणार आहे.

यामुळे रेस्टॉरंटमध्ये पुन्हा आलेल्या ग्राहकाला ओळखणे सोपे होणार आहे. तुमची ओळख पटण्यासाठी एक नवीन आणि वेगळा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही तुमची हेअरस्टाईल, मेकअप बदलले असेल तरीही तुमच्या चेहऱ्याच्या बेसिक वैशिष्ट्यांनुसार तुमची ओळख या तंत्राव्दारे पटणार आहे. या तंत्रज्ञानामार्फत नोंद झालेल्या कोणत्याही माहितीचा गैरवापर होऊ शकत नाही. कारण याठिकाणी डेटा सेव्ह होण्याचे तंत्र विकसित करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरणे सुरक्षित असेल असे यंत्र तयार करणाऱ्या कंपनीकडून सांगण्यात आले आहे.