...तर अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्यास तयार - हूकुमशाहा किम जॉन उन

दक्षिण आणि उत्तर कोरियातील संघर्षावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसतंय.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 7, 2018, 11:27 AM IST
...तर अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्यास तयार - हूकुमशाहा किम जॉन उन title=

उत्तर कोरिया : दक्षिण आणि उत्तर कोरियातील संघर्षावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसतंय. जर सुरक्षेची हमी मिळाली तर उत्तर कोरिया आपला अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्यास तयार असल्याचं हूकुमशाहा किम जॉन उननं म्हटल्याचं पुढे आलंय.

बातचीत करण्यास सहमती

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जॉन उन च्या पियोंगयंगमधल्या त्याच्या कार्यालयात दक्षिण कोरियाच्या काही वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. दोन्ही देशांनी युद्ध जन्य परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी यापुढेही बातचीत करण्यास सहमती दर्शवली. दक्षिण कोरियाच्या दहा सदस्यीय प्रतिनिधी मंडळानं काल किम जॉन उनची भेट घेतली. या भेटीच्या वेळी उत्तर कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चुंग योंगही उपस्थित होते. 

अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्यास हुकूमशाहा तयार

याच भेटीचा वृत्तांत दक्षिण कोरियाच्या सरकारनं जारी केला. त्यात अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्यास हूकमशाह किम जॉन उन तयार असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान उत्तर कोरियानं या वृत्ताला कुठलाही दुजोरा दिलेला नाही. तर तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बातचित सुरु ठेवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय.