उष्णतेने मोडला ७१ वर्षांचा विक्रम; नॉर्वेलाही उन्हाचे चटके

पाहा व्हिडिओ, नॉर्वेतील नागरिकांची जीवनशैली आणि संस्कृती..

Updated: May 26, 2018, 10:46 AM IST
उष्णतेने मोडला ७१ वर्षांचा विक्रम; नॉर्वेलाही उन्हाचे चटके title=
छायाचित्र सौजन्य: युट्युब

कोपनहेगन : वाढत्या उष्णतेमुळे केवळ भारतच नव्हे तर, जगभरातील अनेक देश हैराण झाले आहेत. वर्तमान जगात असेही काही देश आहेत, ज्या देशांतील तापमान या आधी कमालीचे थंड होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यात कमालीची वाढ होत असून, वाढत्या तापमानाने या देशातील गेल्या ७१ वर्षांतील विक्रमही मोडीत काढला आहे. होय, आम्ही सांगतो आहोत नॉर्वे या देशाबद्दल. नॉर्वेतील तापमानाचा सध्याचा पारा १४.४ डिग्री सेल्सियस अंशावर आहे. पण, नॉर्वेतील गेल्या ७१ वर्षांचा इतिहास पाहता हे तापमान बरेच जास्त आहे.

अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण

अचानक वाढणाऱ्या तापमानाचे नेमके कारण काय असावे? याबाबत माहिती सध्यातरी उपलब्ध नाही. पण, नॉर्वेच्या हवामान विभागाने वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करतानाच नागरिकांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. दरम्यान, येत्या काळात हेच तापमान ३० डिग्री अंश सेल्सीयसवरही पोहोचण्याची शक्यता आहे. भारतासारख्या देशात ३० डिग्री सेल्सियस अंश तापमान म्हणजे काहीच नाही. पण, नॉर्वेसाठी हे तापमान प्रचंड मोठे आहे.

नॉर्वेचा आग नियंत्रण विभाग सक्रीय

नॉर्वेतील आगीवर नियंत्रण ठेवणाऱ्या विभागाने लोकांना उघड्यावर आग न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथील लोकांमध्ये जंगलातील खुल्या जागेत असलेल्या गवताला आग लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे आग नियंत्रण विभागाने ही सूचना केली आहे. दरम्यान, जर्मनीनेही आपल्या देशातील नागरिकांना असाच इशारा दिला आहे. भारतातही गेल्या काही दिवसात तापमान कमालीचे वाढत असून, उष्णतेमुळे लोकांना प्रचंड त्रास होताना दिसत आहे.