पार्कमध्ये जोडप्याने शूट केले न्यूड फोटो; पर्यटकांच्या कारनाम्यामुळे हा मुस्लिम देश संतप्त

 मुस्लिम  बहुल देश इंडोनेशिया काही पर्यटकांच्या अश्लील वागण्यामुळे संतप्त आहे

Updated: Sep 25, 2021, 09:20 AM IST
पार्कमध्ये जोडप्याने शूट केले न्यूड फोटो; पर्यटकांच्या कारनाम्यामुळे हा मुस्लिम देश संतप्त title=

जकार्ता : मुस्लिम  बहुल देश इंडोनेशिया काही पर्यटकांच्या अश्लील वागण्यामुळे संतप्त आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याबाबत पोलिसांवर दबाव वाढला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पर्यटकांनी पर्यटन स्थळावर अश्लील फोटो शूट केले आहे.

इंडोनेशियामध्ये या पर्यटकांचे अश्लील फोटो वायरल झाले आहेत. त्यामुळे पोलीस त्यांच्या शोधात आहेत. या फोटोंमध्ये दोन महिला आणि एक पुरूष पर्यटन स्थळी अश्लील फोटोशूट करताना दिसत आहेत. इंडोनेशियामध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील वागणूकीबाबत कठोर नियम आहेत. 

द सनच्या रिपोर्ट नुसार,  इंडोनेशियाच्या Tangerang च्या Koja Cliff Park मध्ये दोन महिला आणि एका पुरूषाच्या अश्लील फोटोशूटमुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

कोविड 19 च्या निर्बंधांमध्ये पार्क सारख्या सार्वजनिक स्थळांवर जाण्यास मनाई असताना हे पर्यटक तेथे पोहचले कसे याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. मुस्लिम देश इंडोनेशियामध्ये पर्यटन स्थळांवर न्यूड फोटो घेण्याबाबत तसेच ऑनलाईन पोस्ट करण्याबाबत कठोर कायदे आहेत.