पिझ्झा डिलिव्हरी बॉयसाठी घराचा दरवाजा उघडताच; अंगावर काटा आणणारा Video Viral

Robbed Viral Video : तिने पिझ्झा ऑर्डर केला...भूक लागल्यामुळे ती वाट पाहत होती..तो आला म्हणून तिने दरवाजा उघडताच क्षणी पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं धक्कादायक कृत्य...

नेहा चौधरी | Updated: Apr 29, 2023, 04:53 PM IST
पिझ्झा डिलिव्हरी बॉयसाठी घराचा दरवाजा उघडताच; अंगावर काटा आणणारा Video Viral   title=
Pizza Delivery Boy Robbed house video viral on internet trending now

Pizza Delivery Boy Robbed Viral Video : भय इथंल संपत नाही...असंच म्हणायची वेळ आली आहे. आता आपल्याच घरात आपण सुरक्षित नाही. इथे कोणावर विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून पडला आहे. रोज दारावर कधी इस्त्रीवाला, तर कधी पोस्टमॅन येतो. आपण अनेक वेळा घरी जेवण बनविण्याचा कंटाळा आला तर बाहेरून जेवणाची ऑर्डर देतो अशा वेळी डिलिव्हरी बॉय घरी येऊन पार्सल देऊन जातात. 

आपल्या दारावर येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या ओळखीचा असो वा नसो त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे हे कसं समजणार. इथे प्रत्येक संबंध विश्वासावर चालतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये दारावर येणाऱ्या या व्यक्तींमुळे घरफोडींच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

घरातील सदस्याने भूक लागली म्हणून पिझ्झा ऑर्डर केला. ते वाट पाहत असतानाचा दारावर बेल वाजते पिझ्झा देण्यासाठी डिलिव्हरी बॉय आलेला असतो. म्हणून ते दार उघडण्यास जातात. पण दार उघडल्यानंतर त्यांचा पायाखालची जमिनीच सरकते. 

जसं घरातील सदस्य दरवाजा उघडतात तो डिलिव्हरी बॉय बंदुक काढून त्यांचावर हल्ला करत घरात शिरतो. दारावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये घरातून गोळीबाराचा आवाज येतोय. (Pizza Delivery Boy Robbed house video viral on internet trending now)

या डिलिव्हरी बॉयने तोंडाला मास्क धारण केला आहे आणि त्याचा हातात पिझ्झाचा बॉक्स दिसत आहे. पण त्या बॉक्सच्या आड त्याने बंदूक लपवलेली असते. तो जबरदस्ती घरात घुसतो आणि लुटमार करतो. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 19 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये पुढे काय झालं हे मात्र समजू शकलेलं नाही. व्हिडीओमध्ये गोळीबाराचा आवाज येतं असल्याने घरात कोणी जखमी झालं का? त्या चोराला अटक झाली का? ही घटना नेमकी कुठलीही आहे याबद्दल अद्याप काही स्पष्ट झालेलं नाही. 

काही दिवसांपूर्वी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका आई आणि मुलीवर बाइकवरुन आलेल्या चेन स्नेचर हल्ला केला होता. मायलेकीने या चोऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली.

हेसुद्धा वाचा - Viral Video : बाइकवरुन साखळी चोर आला अन् मग... मायलेकीने काय केलं? बघा हा व्हिडीओ

या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.