Planet parade : आज संध्याकाळी निरभ्र आकाशात पाहायला मिळणार अद्वितीय दृश्य, ग्रह रांगेत येणार आणि....

Planet parade: ग्रह एका रांगेत येणार आणि ते अगदी सहजपणे तुम्ही आम्ही पाहूही शकणार. कसं, ते जाणून घ्या. हा दिवस यानंतर थेट 17 वर्षांनी उजाडणार आहे. त्यामुळं आजची संध्याकाळ फार महत्त्वाती आहे.   

Updated: Mar 28, 2023, 12:55 PM IST
Planet parade : आज संध्याकाळी निरभ्र आकाशात पाहायला मिळणार अद्वितीय दृश्य, ग्रह रांगेत येणार आणि....  title=
Planet parade 2023 where to watch impact latest Marathi news

Planet parade: मनुष्य म्हणून आपण ज्या पृथ्वीवर राहतो, जे आयुष्य जगतो आणि जे काही अनुभवतो हे सर्वकाही अद्वितीय आहे. माणूस म्हणून जगत असताना आपण संपूर्ण विश्वाशी असणारं नातं या न त्या परिनं जपत असतो. हे नातं इतकं खास आहे की, ही सृष्टी क्षणोक्षणी आपल्याला अवाक् करत असते. आपण तिच्यापुढे किती लहान आहोत याचीच प्रचिती देत असते. असंच काहीसं दाखवून देणारं असामान्य दृश्य मंगळवारी (आज) सायंकाळी आकाशामध्ये पाहायला मिळणार आहे. आज सायंकाळी बुध, शुक्र, मंगळ, गुरू, युरेनस हे ग्रह एका रांगेत येऊन एक सुंदर पथ संचलनच (Planet parade) सादर करणार आहेत. (Planet parade 2023 where to watch impact latest Marathi news)

लक्षात घेण्याजोगी आणि कुतूहलाची बाब म्हणजे मंगळ, शुक्र आणि गुरू या ग्रहांना पाहण्यासाठी तुम्हाला दुर्बिणीचीही मदत घ्यावी लागणार नाही. तर, बुध आणि युरेनस पाहण्यासाठी मात्र तुम्हाला बराच आटापिटा करावा लागू शकतो. पण, दुर्बिण तुमची यात मदत करेल. 

कधी पाहू शकाल हा योग? 

ही Planet parade तुम्ही मंगळवारी म्हणजेच 28 मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पाहू शकाल. सूर्यास्तानंतर साधारण 30 मिनिटांनी हे ग्रह आकाशातून दिसेनासे होतील. त्यामुळं त्याआधीच तुम्ही हे अद्वितीय दृश्य पाहून घ्या. या संधीला मुकलात तर, थेट 17 वर्षांनंतर म्हणजेच 2040 मध्ये तुम्ही असंच काहीसं दृश्य पाहू शकाल. 

आकाशात ग्रहांची परेड पाहण्यासाठी नेमकं काय करावं? 

आकाशातील हे दृश्य पाहण्यासाठी तुम्ही सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे पाहा. नासाच्या उल्कापिंड पर्यावरण कार्यालयाचे प्रमुख बिल कुक यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही ही ग्रहांची रचना जवळपास 50 अंशांच्या कोनात पसरलेली पाहू शकतात. थोडक्यात क्षितिजाच्या अर्ध्यापर्यंत तुम्हाला ही रचना पाहता येईल. यामध्ये शुक्र अधिकच स्पष्टपणे दिसणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Ramadan 2023 : 24 तासात 16 सूर्यास्त...; रमजानमुळे स्पेस स्टेशनवरील 'तो' अंतराळवीर संभ्रमात

 

मंगळवारी भारतामध्ये सूर्यास्ताची वेळ सायंकाळी 6 वाजून 28 मिनिटांनी आहे. तर, ही ग्रहांची रचना 6.36 ते 7.15 या दरम्यान अधिक स्पष्टपणे तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळं ग्रहांची ही सुरेख रचना पाहण्यासाठी तुम्हीही सज्ज व्हा. कारण, नंतर बरीच प्रतीक्षा करावी लागू शकेल.