मोफत काहीच मिळत नाही; जादूच्या झप्पीसाठी 'हा' पुरुष घेतो इतके पैसे

'या' पुरूषाच्या एका जादूच्या झप्पीसाठी मुलीही असतात रांगेत, एका मिठीसाठी मोजतात एवढे पैसे  

Updated: Jul 20, 2022, 12:12 PM IST
मोफत काहीच मिळत नाही; जादूच्या झप्पीसाठी 'हा' पुरुष घेतो इतके पैसे title=

Professional Cuddler: तुम्ही कधी ऐकलं आहे का एखादा व्यक्ती मिठी मारण्यासाठी पैसे घेत असेल. ब्रिटनमधील एक पुरुष असा आहे, जो कोणालाही मिठी मारण्यासाठी हजारो रुपये घेतो. मुली देखील त्याला मिठी मारण्यासाठी रंगेत असतात. मुली देखील ज्याच्या एका मिठीसाठी रंगेत असतात त्याचं नाव ट्रेवर हूटन आहे. तो व्यवसायाने एक कडलर (Professional Cuddler) आहे. त्यामुळे तो अनेकांना 'कडल थेरेपी'  देतो. 

ट्रेवर हूटनच्या कंपनीच नाव  एम्ब्रेस कनेक्शंस (Embrace Connections)आहे. ट्रेवर हूटन समोरच्याला 'कडल थेरेपी' देण्यासाठी एका तासाचे तब्बल 7 हजार रुपये घेतो. कडल थेरपीचा हेतू केवळ मिठी मारणे हा नसून स्पर्श करून एखाद्याच्या मनात काळजी, आपुलकी आणि सद्भावना निर्माण करणे हेच ट्रेवर हूटनचं ध्येय आहे.

ट्रेवर हूटन सांगतो की, लोक त्याच्या कामाचा संदर्भ सेक्स वर्कसोबत जोडतात. पण कडल थेरपीमध्ये सेक्स येत नसल्याचं ट्रेवर हूटन यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या लोकांना भावनिक आधाराची गरज असते, इतरांना आपुलकीची भावना देण्यासाठी मी हा व्यवसाय करत असल्याचं देखील ट्रेवर हूटनने सांगितलं आहे. 

लोकांना मिठी मारल्याने सुरक्षिततेची आणि शांततेची भावना मिळते. ट्रेवर म्हणतात की कडल थेरपिस्ट ग्राहकांना वेळ, लक्ष आणि काळजी देतात. सुरुवातीला लोकांना अनोळखी व्यक्तीला मिठी मारणे विचित्र वाटते, परंतु काही वेळानंतर त्यांना सुरक्षित असल्याचं लक्षात येत.