Russia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

Russia Ukraine War News : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता 141 देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Updated: Feb 24, 2023, 12:06 PM IST
Russia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय title=

Russia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. रशियाने युक्रेनमधील (Ukraine War) सैन्य माघारी घेऊन तिथं शांतता प्रस्थापित करावी, असा ठराव संयुक्त राष्ट्रात मंजूर करण्यात आला आहे. (world war 3) मात्र, भारताने युक्रेनमध्ये 'शांतता कायमस्वरुपी नांदावी' या संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) ठरावापासून दूर राहणे पसंत केले आहे. (Ukraine Russia War News)

रशियाच्या युद्धाविरोधात शांतता ठराव मांडला गेला आहे. 141 देशांनी या ठरावाला संमती दिली आहे. तर 7 देशांनी या ठरावाविरोधात मतदान केले. भारत, चीनसह 32 देशांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.  दरम्यान युक्रेनमधील परिस्थितीवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्राच्या सभेत म्हटले आहे.

रशियाने युक्रेनला धडा शिकविण्यासाठी थेट हल्ला चढवला. युक्रेनला चारहीबाजुने घेराव घालण्याचा प्रयत्न केला. रशिया युद्धाला आज वर्ष झाल आहे. दरम्यान, बलाढ्य रशियापुढे युक्रेनने तीव्र प्रतिकार करत माघार घेतलेली नाही. हे युद्ध 15 दिवसात रशिया संपवेल अशी शक्यता होती. मात्र, युक्रेने आश्चर्यकारक युद्धाचा सामना केला. या युद्धात रशियाच्या हल्ल्यात हजारो लोक मारले आहेत आणि शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दोन्ही देशांकडून अद्याप युद्ध सुरुच आहे. अनेक संभाव्य आणखी विनाशकारी हल्ल्याची तयारी सुरु असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे.

रशियन सैन्‍याने घेतले खेरसन ताब्‍यात

24 फेब्रुवारी 2022 राेजी रशियाने युक्रेनवर हल्‍ला चढवला. मार्च 2022 मध्‍ये  रशियन सैन्याने युक्रेनचे खेरसन शहर ताब्‍यात घेतले. या शहरात व्यापारी जहाजे, टँकर, कंटेनर जहाजे, आइसब्रेकर आणि जहाजे बनवली जातात.  यानंतर मे महिन्यात रशियन सैन्याने मारियुपोल शहरावर ताबा मिळवण्यासाठी मोहीम आखली. यावेळी झालेल्‍या हवाई हल्‍ल्‍यात मारियुपोलमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. 

ऑगस्‍टमध्ये युक्रेन सैन्‍याकडून रशियाला जोरदार प्रत्‍युत्तर

युक्रेनच्या सैन्याने ईशान्य युक्रेनमध्ये खार्किव प्रदेशाच्या दिशेने अचानक चढाई केली. या हल्ल्याला उत्तर देण्याऐवजी रशियन माघार घ्यावी लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या युद्धात युक्रेनपेक्षा रशियाचे सैनिक अधिक ठार झाल्‍याचा दावा नॉर्वेने केला आहे. नॉर्वेचे लष्‍कर प्रमुख जनरल ॲरिक क्रिस्‍टोफरसन याने म्‍हटलं आहे की, या युद्धात रशियाचे सुमारे 1 लाख  80 हजार सैनिक ठार झाले.  तर युक्रेनचे सुमारे 1 लाख सैनिक मृत्‍युमुखी पडले आहेत. रशियाचे 2 लाखांहून अधिक सैनिक मारले गेले असावेत, असा अंदाज अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांतील काही अहवालांत नमूद आहे.

एकटा युक्रेन रशियाशी लढला

एकटा युक्रेन रशियाशी लढला. त्यानंतर युक्रेनला अमेरिकेसह 30 देशांची मदत केली. मागील एक वर्ष युक्रेनला अमेरिकेसह 30 हून अधिक देशांनी शस्‍त्रात्र पुरवठा केला आहे. अमेरिकेने युक्रेनला 56 लढाउ विमानांचा पुरवठा केला आहे. अमेरिका युक्रेनला 50 कोटी डॉलर किंमतीचे शस्‍त्र पुरवठा केला आहे. तर युक्रेनला मदत करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल, अशी जाहीर धमकी रशियाने दिली होती. त्यामुळे सुरुवातीला युक्रेनला मदत कोणीही केली नाही. एकट्या युक्रेनने रशियाला टक्कर देत आपले अस्तित्व टिकवून ठेवले, पण शरणागती पत्करली नाही.