Video : विमानात प्रवाशाचा एअर होस्टेसवर हल्ला; गाठावं लागलं थेट रुग्णालय

हे प्रकरण एवढं वाढलं की या प्रकरणी एफबीआयला पाचारण करावे लागले 

Updated: Nov 15, 2022, 04:30 PM IST
Video : विमानात प्रवाशाचा एअर होस्टेसवर हल्ला; गाठावं लागलं थेट रुग्णालय title=

गेल्या काही दिवसांमध्ये विमानांमध्ये (Plane) हाणामारीच्या (Fight) घटना वाढताना दिसत आहेत. राग अनावर झाल्यानंतर अशा कृती घडताना दिसत आहे. या घटनांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र हाणामारी करणारे प्रवासी आपल्यासोबतच इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात घालत असतात. असाच काहीसा प्रकार अमेरिकीतील विमानात (Flight) घडला आहे. विमानातच महिला प्रवासी आणि एअर होस्टेसमधील वाद झाल्याचे पाहायला मिळतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे विमान सॅन फ्रान्सिस्कोहून शिकागोला जात होते. या विमानात बसलेल्या प्रवाशांना विमानात एवढा गोंधळ होणार होईल याची कल्पनाही नव्हती. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला प्रवासी तिच्या मुलासोबत होती. यावेळी तिचा एअर होस्टेससोबत वाद झाला.

या व्हिडीओमध्ये मुलासोबत असलेली एक महिला फ्लाइट अटेंडंटवर ओरडताना दिसत आहे. यावेळी महिलेला मागे हटण्यास सांगितले जाते. पण ती तसे न करता वाद सुरु ठेवते. या वादानंतर एअर होस्टेसला रुग्णालयात नेण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे. महिला आणि फ्लाइट अटेंडंटमध्ये वाद कशामुळे झाला, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या गोंधळामागील कारणही अद्याप उघड झालेले नाही.

वाद वाढल्यानंतर इतर क्रू मेंबर्स फ्लाइट अटेंडंटच्या मदतीसाठी पुढे धावले. या प्रकरणी एफबीआयला पाचारण करावे लागले लागल्याने यावरून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. एफबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.