माथेफिरुने महिला चालकाच्या कारला लावली आग

सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर काही जणांची माथी भडकली आहेत.  

Updated: Jul 5, 2018, 06:24 PM IST
माथेफिरुने महिला चालकाच्या कारला लावली आग title=

रियाध : सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर काही जणांची माथी भडकली आहेत. अशाच एका माथेफिरुने एका महिलेच्या गाडीला आग लावली. सलमा अल शरीफ असं या ३१ वर्षीय महिला चालकाचं नाव आहे.

मुस्लिम धर्मस्थळ मक्का इथून जवळच त्या एका कंपनीमध्ये खजिनदार आहेत. परवानगी मिळाल्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना घेतलेल्या मोजक्या  महिलांपैकी त्या एक आहेत. कुणीतरी आपली गाडी मुद्दाम जाळल्याचा आरोप सलमा यांनी केलाय. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून मक्का पोलीस अधिक तपास करतायत.