तो कॅनडात स्किइंग करायला गेला आणि जीव गमावून बसला

17 वर्षांचा एक जर्मन युवक कॅनडात स्किइंग करताना मृत्युमुखी पडला.

Updated: Dec 7, 2017, 03:44 PM IST
तो कॅनडात स्किइंग करायला गेला आणि जीव गमावून बसला

कॅलगरी : 17 वर्षांचा एक जर्मन युवक कॅनडात स्किइंग करताना मृत्युमुखी पडला.

किशोरवयीन जर्मन

एका किशोरवयीन जर्मनचा कॅलगरी येथील इस्पितळात मृत्यु झाला.
लेक लुइस इथे स्किइंगचं ट्रेनिंग घेत असताना मॅक्स बर्कहार्ट या स्की रेसर युवकाचा दुर्दैवी अंत झाला. कॅनडातल्या स्किइंगचं प्रशासकीय नियंत्रण करणाऱ्या "अल्पाइन कॅनडा" या संस्थेने या संबंधीची माहिती दिली.

अल्पाइन कॅनडाच्या भावना

"अल्पाइन कॅनडा" या संस्थेने याबाबतीत आपल्या भावना व्यक्त केल्यायेत. या दुखद घटनेने आम्ही हादरलो असून, मॅक्सचे कुटुंबीय आणि त्याच्या सहकाऱ्यांकडे शोक संदेश पोहोचवल्याचे, तसच त्याच्या आत्म्याला शांती लाभो असं त्यांनी म्हटलयं. 

कसा झाला अपघात

प्रशिक्षणाच्या दुपारच्या सत्रात मॅक्सचा तोल जाऊन तो सुरक्षेसाठी असलेल्या जाळ्यावर आदळला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला कॅलगरीतल्या इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.