धक्कादायक! अमेरिकेतील मीट फॅक्टरी बनली 'कोरोना फॅक्टरी'

ही आहे अमेरिकेच्या महाविनाशाची गोष्ट 

Updated: Apr 25, 2020, 10:40 AM IST
धक्कादायक! अमेरिकेतील मीट फॅक्टरी बनली 'कोरोना फॅक्टरी' title=

मुंबई : अमेरिकेत कोरोनामुळे बाधित झालेल्या मृतांचा आकडा हा ५० हजारांच्या पार पोहोचला आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सतत हा दावा करत आहेत की, हळू हळू अमेरिकेत कोरोना आटोक्यात येत आहे. मात्र हा दावा सत्यापेक्षा अनेक मैल दूर असल्याचं चित्र समोर आलं आहे. अमेरिकेतील सगळ्यात मोठ्या फॅक्टरीला कोरोना व्हायरसने आपल्या जाळ्यात ओडलं असून हे सत्य ट्रम्प यांना माहित नव्हतं. 

चीनच्या वुहान मीट मार्केटनंतर आता अमेरिकेतील मीट फॅक्टरीमुळे साऊथ डकोटा राज्यात जवळपास ५५% लोकांना कोरोनाची लागण झाल्याची शंका वर्तवली जात आहे. या मीट फॅक्टरीतील ३७०० कर्मचाऱ्यांपैकी ७२५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्वाचं म्हणजे याच फॅक्टरीतून बाहेर सगळीकडे मीटचा पुरवठा केला जातो. 

जगभरात कोरोनाने थैमान मांडल आहे. मात्र अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार पसरला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे ५० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती सुधारण्यापेक्षा अधिकच बिघडत असल्याचं चित्र समोर येत आहे. याचं महत्वाच कारण म्हणजे अमेरिकेतील साऊथ डकोटातील ही मीट फॅक्टरी.

अमेरिकेतील साऊथ डकोटामध्ये स्मिथफील्ड ही फॅक्टरी आहे. स्मिथफील्ड हे अमेरिकेतील पोर्क मीटचं सर्वात मोठी ब्रँड आहे. या फॅक्टरीतून कोरोना आता एखाद्या वणव्याप्रमाणे पसरत आहे. कर्मचाऱ्यांच्या संख्येत ही स्मिथफील्ड फॅक्टरी ही शहरातील चौथी मोठी फॅक्टरी आहे. या फॅक्टरीत कोरोना एखाद्या वणव्याप्रमाणे पसरत गेला.