"गांजाचे सेवन किंवा बाळगणे आता गुन्हा नाही"; तुरुंगात असलेल्यांची होणार सुटका

गांजाला गुन्हेगारीच्या कक्षेपासून दूर करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आलं आहे

Updated: Oct 7, 2022, 01:56 PM IST
"गांजाचे सेवन किंवा बाळगणे आता गुन्हा नाही"; तुरुंगात असलेल्यांची होणार सुटका  title=

अमेरिकेत (US) गांजा (Cannabis) बाळगल्याबद्दल दोषी ठरलेल्या हजारो लोकांची शिक्षा आता माफ करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनी गुरुवारी ही घोषणा केली. हे पाऊल फेडरल कायद्यांतर्गत या अमली पदार्थाला (Drug) गुन्हेगारीच्या कक्षेपासून दूर करण्याच्या दिशेने उचलण्यात आले आहे. 'गांजाचे (Marijuana) सेवन केल्याबद्दल किंवा बाळगल्याबद्दल कोणालाही तुरुंगात टाकले जाऊ नये यावर माझा विश्वास आहे. गांजाबद्दल (Marijuana) असेलेल्या आपच्या दृष्टिकोनामुळे अनेक लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. चुकीच्या गोष्टी सुधारण्याची वेळ आली आहे,' असे बायडेन यांनी म्हटलं आहे.

गांजा (Marijuana) बाळगल्याबद्दल लोकांना तुरुंगात टाकले जात आहे. तर अनेक राज्यांमध्ये त्यावर बंदी नाही, असे बायडेन म्हणाले. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात बायडेन (joe biden) यांनी हे प्रकरण हाताळण्याच्या पद्धतींचा उल्लेख केल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये यातून होणाऱ्या वांशिक भेदभावावरही त्यांनी भाष्य केले आहे.

दोन्ही प्रकारचे  प्रकारचे लोक गांजाचे सेवन करतात. पण सर्वात जास्त कृष्णवर्णीय लोकांना गांजाचे सेवन केल्याबद्दल किंवा बाळगल्याबद्दल अटक केली जाते. त्यांच्यावर खटला चालवला जातो आणि दोषी सिद्ध झाल्यास त्यांना तुरुंगात टाकले जाते, असेही बायडेन म्हणाले.

जो बायडेन यांनी गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यांसाठी माफीची मोठी घोषणा केलीय. बायडेन यांनी राज्यपालांना गांजाशी संबंधित प्रकरणे राज्य सरकारी कार्यालयांपासून वेगळी करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून त्यांना सुधारणा करण्याची संधी मिळेल. बायडेन म्हणाले की, प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून गांजा फेडरल कायद्यांतर्गत कसे येते याचा अभ्यास केला जाईल. सध्या, गांजाचा सर्वात धोकादायक पदार्थांच्या श्रेणीमध्ये आहे, ज्यामध्ये हेरॉइन आणि एलएसडी देखील समाविष्ट आहे.

राष्ट्रपतींच्या या निर्णयाचा फायदा अशा लोकांना होणार आहे ज्यांची नावे गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हेगारी नोंदीमध्ये नोंदवली गेली आहेत. या लोकांनी नोकरी, घर किंवा शिक्षणाशी संबंधित अनेक संधी गमावल्या.