'या' देशातून एक मुस्लिम यंदा हज यात्रेला जाणार नाही; काय घडलं नक्की?

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सातत्याने अनेक मोठी पावले उचलली जात आहेत. सरकार आणि धार्मिक संघटनांनी मिळून निर्णय घेतला आहे की, यावेळी कोणताही मुस्लिम हज करणार नाही. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Jun 2, 2022, 11:55 AM IST
'या' देशातून एक मुस्लिम यंदा हज यात्रेला जाणार नाही; काय घडलं नक्की? title=

नवी दिल्ली : Sri lanka Muslim will not go Hajj:आर्थिक संकटात अडकलेला श्रीलंका यातून बाहेर पडण्यासाठी सर्व उपाय करत आहे. तिकडे महिंद्र राजपक्षे यांच्या जागी पंतप्रधान झालेले रानिल विक्रमसिंघे सातत्याने अनेक मोठे निर्णय घेत आहेत. त्याचबरोबर या निर्णयांना लोकही सहकार्य करत आहेत. खुद्द श्रीलंकेतील नागरिकही या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

याच क्रमाने श्रीलंकेतील मुस्लिमांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील आर्थिक संकट पाहता तेथील मुस्लिम समाजाचे यावर्षी हज यात्रा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक संघटनांनी मिळून हा निर्णय घेतला

अहवालानुसार, सौदी अरेबियाने 2022 या वर्षासाठी श्रीलंकेतील 1585 हज यात्रेकरूंचा कोटा मंजूर केला होता.

नॅशनल हज कमिटी, श्रीलंका हज टूर ऑपरेटर्स असोसिएशन आणि मुस्लिम धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवहार विभागासह इतर अनेक पक्षांच्या चर्चेनंतर, श्रीलंकेतील कोणताही मुस्लिम यावेळी हज करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही, म्हणून जाणार नाही...

ऑल-सिलोन हज टूर ऑपरेटर्स असोसिएशन आणि श्रीलंकेच्या हज टूर ऑपरेटर्स असोसिएशनने मुस्लिम धार्मिक आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, "आपल्या देशातील सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही संघटनांच्या सदस्यांनी यंदा हजला न जाण्याचा निर्णय घेतला आहे''. त्यामुळे यावर्षी श्रीलंकेतून एकही मुस्लिम हजला जाणार नाही.

देशाला परकीय चलनाची गरज

या सगळ्यामध्ये हज टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष रिझमी रियाल म्हणाले, "देश सध्या डॉलरच्या गंभीर टंचाईचा सामना करत आहे, या संकटावर मात करण्यासाठी देशाला अधिकाधिक परकीय चलनाच्या साठ्याची गरज आहे. अशा परिस्थितीत यावेळी श्रीलंकेतून कोणीही हजला जाणार नाही, असा निर्णय आम्ही सर्वांनी एकमताने घेतला आहे.