तालिबानचा सर्वोच्च नेता पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात, भारतीय अधिकाऱ्याचे संकेत

तालिबानचा प्रमुख हैबतुल्लाह अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) बराच काळ बेपत्ता आहे.

Updated: Aug 20, 2021, 06:40 PM IST
तालिबानचा सर्वोच्च नेता पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात, भारतीय अधिकाऱ्याचे संकेत title=

इस्लामाबाद : तालिबानचा सर्वोच्च नेता हैबतहुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) कुठं आहे? भारत सरकार परदेशी गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीचा अभ्यास करतेय. हैबतहुल्ला पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असू शकतो, असे संकेत एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिले आहेत. वरिष्ठ तालिबान नेते आणि सेनानींनी हैबतहुल्लाला मागील 4 महिन्यांपासून पाहिले नाही. (supreme leader of the Taliban Hibatullah Akhundzada is in the custody of the Pakistani army, according to Indian official) 

2016 मध्ये दहशतवादी समूहाचं नेतृत्व...
 
अधिकाऱ्यानुसार, हा मुद्दा पाकिस्तान कसा हाताळतो यात भारताला रस घेत आहे. अमेरिकन ड्रोन हल्ल्यात माजी नेता अख्तर मन्सूर ठार झाला. यानंतर हैबतुल्लाह अखुंदजादाची मे 2016 मध्ये तालिबान प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी दहशतवादी गटाने एक व्हीडिओ शेअर केला होता. त्या व्हीडिओनुसार,  मंसूरच्या दोन नायबांपैकी हैबतुल्ला हा एक होता. त्याला पाकिस्तानमध्ये एका बैठकीदरम्यान प्रमोट केलं होतं. 
 
कायदेपंडित हैबतुल्लाह 

एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, अखुंदजादा कायद्यात पारंगत आहे. अखुंदजादा हे 7 तालिबान नेत्यांपैकी एक आहेत जे अफगाणिस्तानमधील कारवायांचे नेतृत्व करु शकतील, अशी अपेक्षा केली जाते. लष्कर-ए-तोयब्बा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचं तालिबानसोबत पटत असल्याचंही भारतात म्हटलं जातं.
 
तालिबान वचपा घेण्याच्या तयारीत.... 

संयुक्त राष्ट्र संघाने एक रिपोर्ट जारी केला आहे. तालिबान काबूलमध्ये अमेरिका आणि नाटो सैन्याला सहकार्य करणाऱ्या लोकांना शोधत आहे. तसेच त्यांना शोधण्यासाठी घरोघरी जात आहे', असा इशारा या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. तसेच दहशतवादी गटाकडे निवडक लोकांची यादी आहे ज्यांनी परदेशी सैन्यासाठी विशेष भूमिका बजावली. जर हे लोक स्वत: दहशतवाद्यांसमोर शरण गेले नाहीत, तर त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची किंवा अटक करण्याची धमकी देण्यात आली आहे.

तालिबान्यांची आठवड्यातच पलटी

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. यानंतर तालिबानने पहिली पत्रकार परिषद घेतली. यामध्ये तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने अनेक घोषणा केल्या. आम्ही आमच्या विरोधकांना कोणताही त्रास देणार नाही. आम्ही त्यांना क्षमा केलं जाईल. आम्ही कोणाच्याही दारात विचारायला जाणार नाहीत, की तुम्ही त्यांना मदत का केली, असं या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. मात्र आता तालिबान्यांनी आठवड्याभरातच पलटी मारली आहे.