ही महिला एका रात्रीत बनली २५ मिलियन डॉलर्सची मालकीन

आपल्याला जर लॉटरी लागली तर? आपण एका रात्रीत श्रीमंत झालो तर, असे कल्पनाविलासात रमवणारे अनेक विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात येतात. पण, ते कधीच प्रत्यक्षात येत नाहीत. कारण, कष्टाला तरणोपाय नसतो. पण, एका महिलेच्या बाबतीत मात्र, असे घडले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 29, 2017, 04:54 PM IST
 title=

मेलबर्न : आपल्याला जर लॉटरी लागली तर? आपण एका रात्रीत श्रीमंत झालो तर, असे कल्पनाविलासात रमवणारे अनेक विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात येतात. पण, ते कधीच प्रत्यक्षात येत नाहीत. कारण, कष्टाला तरणोपाय नसतो. पण, एका महिलेच्या बाबतीत मात्र, असे घडले आहे.

ऑस्ट्रेलियातील एका महिलेबाबत असा प्रकार घडला आहे. वेनराईट असे या महिलेचे नाव असून, ती ऑस्ट्रेलियात वकिलीचा व्यवसाय करते. वेनेरेट नेहमी प्रमाणे आपली बॅंक खात्यातील शिल्लख तपासत होती. तिने खात्यातील रक्कम तपासताच बॅंकेकडूनही तिला ती शिल्लख दाखविण्यात आली. मात्र, ही शिल्लख पाहून या महिलेला मोठा धक्का बसला. बराच वेळ ती या धक्क्यातून सावरली नाही. कारण तिच्या खात्यात चक्क २५ मिलियनची शिल्लख होती.

Sunday Morning Herald ने दिलेल्या वृत्तानुसार, बॅंकेच्या एका चुकीमुळे या महिलेच्या खात्यात २५ मिलियन जमा झाले होते. वेनेरेट जेव्हा या धक्क्यातून सावरली तेव्हा तीने या प्रकाराबाबत बॅंकेला माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे वेनेरेटने या पैशांतील एक रूपयाही स्वत:साठी घेतली नाही. पण, जर इतके पैसे तुला मिळाले तर, तू काय करशील असा प्रश्न विचारला. तेव्हा तिने सांगितले की, मी आईसलॅंडमध्ये घर खरेदी करेन.