विमानतळावर लँडींगचा भयानक थरार, इंधन संपले आणि...

Kathmandu Thrill Of Aircraft Landing : विमानाचा लँडींग गिअर न उघडल्यामुळे हे विमान हवेत दोन तास घिरट्या घालत होते.  

Updated: Sep 28, 2021, 09:31 AM IST
विमानतळावर लँडींगचा भयानक थरार, इंधन संपले आणि... title=

काठमांडू : Kathmandu Thrill Of Aircraft Landing : विमानाचा लँडींग गिअर न उघडल्यामुळे हे विमान हवेत दोन तास घिरट्या घालत होते. त्यामुळे विमानतळावर लँडींगचा भयानक थरार पाहायला मिळाला. हा थरार काठमांडू विमानतळावर लँडींगच्यावेळी सुरु होता. प्रवासी क्रॅश लँडींगची दोन तास वाट पाहात होते.

काठमांडूहून विरटनगरला जाणाऱ्या नेपाळच्या बुद्ध एअरच्या प्रवाशांनी अक्षरशः भयानक स्थिती अनुभवली. विमानाचा लँडींग गिअर न उघडल्यामुळे हे विमान पुन्हा काठमांडूकडे वळवण्यात आले. वैमानिकाने सलग दोन तास हवेत घिरट्या मारत वारंवार लँडींगचा प्रयत्न केला. मात्र तरीही यश आले नाही. 

अखेर इंधन संपूर्ण संपवून विमानाचे क्रॅश लँडींगचा प्रयत्न करण्यात आला. या सगळ्या प्रकारात आत विमानातल्या 73 प्रवाशांचे प्राण कंठाशी आले होते. धावपट्टीवर क्रॅश लँडींगची तयारी करण्यात आली. अग्निशमन वाहने, रूग्णवाहिका, धावपट्टीवर फोम इत्यादी तयारी करण्यात आली. 

मात्र इंधन अगदी अखेरच्या पॉईंटला असताना अचानक लँडींग गिअर चमत्कार झाल्यासारखा उघडला आणि हे विमान सुरक्षितरित्या काठमांडूत उतरवण्यात आले. विमानातल्या 73 जणांचे प्राण वाचले पण ते दोन तास प्रवासी अक्षरशः जवळ येणारा मृत्यूच अनुभवत होते.