२५ लाखांपेक्षा जास्त किंमत असलेले हे श्वान या कारणाने फिरताहेत बेवारस

एका काळात जगातले सर्वात महागड्या प्रजातीचे मानले जाणारे तिबेटी मास्टीफ श्वानांच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. याकारणारे या महागड्या श्वानांना तिबेट आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये बेवारस सोडण्याची वेळ आली आहे.

Updated: Sep 15, 2017, 04:47 PM IST
२५ लाखांपेक्षा जास्त किंमत असलेले हे श्वान या कारणाने फिरताहेत बेवारस  title=

बिजींग : एका काळात जगातले सर्वात महागड्या प्रजातीचे मानले जाणारे तिबेटी मास्टीफ श्वानांच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. याकारणारे या महागड्या श्वानांना तिबेट आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये बेवारस सोडण्याची वेळ आली आहे.

हिमालय क्षेत्रातील या प्रजातीच्या श्वानांच्या किंमती चीनच्या बाजारपेठेत लाखों डॉलर होती. मात्र आता यांच्या किंमतीत घट झाली आहे. 

या श्वानांना अशाप्रकारे बेवारस सोडण्यात आल्याने त्या त्या परिसरांमध्ये पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तिबेट मास्टीफ या श्वानांच्या किंमतीमध्ये घट झाल्याने या श्वानांच्या मालकांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे हजारों श्वास मंदिरं आणि गावांमध्ये फिरत आहेत. ते लोकांवर आणि प्राण्यांवर हल्ले करत आहेत. 

या श्वानांची सुरक्षा करणा-या एका तज्ञांनी सांगितले की, चीनच्या शहरांमध्ये आता मोठा प्रजातीच्या श्वानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच या श्वानांची लोकप्रियता कमी झाली आहे. बिजींग आणि शांघायसहीत अनेक शहरांमध्ये नागरिकांवर ३५ सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंच श्वानांवर बंदी घालण्यात आली आहे. 

Tags: