खरं आहे, २ हजार वर्षांपूर्वीही होते फेरीवाल्यांचे स्टॉल्स

 हे खरे आहे. इटलीच्या (Italy) पोम्पी (Pompeii ) शहरात उत्खननादरम्यान काही थक्क करणारे अवशेष सापडलेत. 

Updated: Dec 30, 2020, 10:23 AM IST
खरं आहे, २ हजार वर्षांपूर्वीही होते फेरीवाल्यांचे स्टॉल्स  title=
दोन हजार वर्षांपूर्वीचे फेरीवाले (Source: Instagram/@massimo_osanna)

लंडन : आपण भारतात मोठमोठ्या शहरात रस्त्याच्या कडेला स्टॉल्स बघतो. मात्र, सुमारे २ हजार वर्षांपूर्वी देखील फेरीवाल्यांचं अस्तित्व होते, असे सांगितले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल ना ? पण हे खरे आहे. इटलीच्या (Italy) पोम्पी (Pompeii ) शहरात उत्खननादरम्यान काही थक्क करणारे अवशेष सापडलेत. (Pompeii was a Roman town in Southern Italy’s Campania region situated along the Bay of Naples)

फेरीवाल्यांचे स्टॉल्सची भिंत नीट पाहिल्यास समजू शकते. भिंतीत कोरलेली ही गोलाकार मडक्यांसारखी भांडी. इटलीतल्या पोम्पी शहरात उत्खननादरम्यान सापडलेले हे अवशेष. इसवी सन ७९ मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकात गाडलं गेलेलं हे शहर... या शहरात रस्त्यांच्या बाजूला लावण्यात येणाऱ्या दुकानांचे भग्नावशेष सापडलेत. गरम आणि गारेगार पदार्थ ठेवण्यासाठीची मातीची भांडी आणि मांडण्या इथं आढळल्या. 

रोमन काळात एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याच्या बाजूला ही दुकाने लावली जात असावीत. लॅटीन भाषेमध्ये पेय मिळण्याच्या काऊंटरला टर्मोपोलीयम म्हणतात. हे अवशेष टर्मोपोलीयमचे असून पुरातत्व संशोधकांना आर्किओलॉजिकल पार्कच्या रीजओ व्ही या ठिकाणी ते सापडले.

रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या या दुकानांचा दर्शनी भाग वेगवेगळ्या चित्रांनी सजवलेला असायचा. कोंबडा, बदक तसेच माशांची चित्रं त्यावर आहेत. या चित्रांचे रंग आजही ताजे आणि फ्रेश वाटतात. या चित्रांमध्ये वापरण्यात आलेले प्राणी हे तेव्हाच्या पदार्थांमध्ये वापरले जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

ज्वालामुखीच्या उद्रेक झाला तेव्हा या पोम्पी शहरामधील १३ हजार लोक राख आणि लाव्हारसामध्ये गाडले गेल्याचे सांगण्यात येते. युनेस्कोनं या जागेला जागतिक वारसा हक्क दर्जा प्रदान केला आहे.