येथे राहण्यासाठी ऑफर केले जातायत १.५ लाख रुपये

एकीकडे जगात काही देशांची लोकसंख्यावाढीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेय तर दुसरीकडे युरोपात अशी काही शहरे आहेत जिथे राहणाऱ्यांची संख्या कमी पडतेय.

Updated: Oct 21, 2017, 03:21 PM IST
येथे राहण्यासाठी ऑफर केले जातायत १.५ लाख रुपये title=

रोम : एकीकडे जगात काही देशांची लोकसंख्यावाढीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेय तर दुसरीकडे युरोपात अशी काही शहरे आहेत जिथे राहणाऱ्यांची संख्या कमी पडतेय.

इटलीमधील कँडेला या शहराचीही अशीच काहीशी अवस्था झालीये. या शहरात राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललीये.

१९९०च्या सुमारास या शहरात जणू काही चैतन्य भरलेले होते. तेच जुने दिवस परत आणण्याचा प्रयत्न कँडेलाचे महापौर करतातय. सुंदर इमारतीं आणि किल्ल्यांसाठी प्रसिद्ध अशा शहराची लिटिल नेपल्स या नावानेही ओळख होती. त्यादरम्यान या शहराची लोकसंख्या ८ हजाराहून अधिक होती. 

मात्र अर्थव्यवस्थेतील घसरण आणि बेरोजगारीमुळे अनेक तरुण हे शहर सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक होतायत. यामुळे कँडेला या शहरात केवळ २७०० लोकच राहिलेत. 

येथील लोकसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने महापौरांनी जोरदार प्रयत्न सुरु केलेत. या शहरात राहण्यासाठी महापौरांकडून लोकांना रक्कमही दिली जाणार आहे. या ऑफरनुसार सिंगल्सना या शहरात राहण्यासाठी ८०० युरोज(साधारण ६१ हजार रुपये), जोडप्यांना १२०० युरोज(साधारण ९२ हजार रुपये) आणि कुटुंबासाठी २००० युरोज(साधारण १.५ लाख रुपये) दिले जाणार आहेत. 

या शहरात आतापर्यंत सहा कुटुंबे राहण्यासाठी आलीत. याशिवाय ५ कुटुंबानी अर्जही सादर केलेत. 

एका गावावरुन मिळाली आयडिया

महापौर निकोला यांच्यामते ही कल्पना त्यांना इटलीमधील बोरमिडा गावातून मिळाली. या गावातही लोकांना राहण्यासाठी पैसे दिले जातायत.