three heads leopard : 'तीन डोक्यांचा बिबट्या'! छायाचित्रकाराचे अफलातून कौशल्य

एकाच बिबट्याचे डोके एकाच आहे. मात्र, तीन वेगवेगळ्या दिशांना बघताना त्याचा हा फोटो घेतला असून यात त्या बिबट्याला तीन डोकी (Three Headed Cheetah) असल्याचा भास होत आहे.

Updated: Jan 28, 2022, 08:51 PM IST
three heads leopard : 'तीन डोक्यांचा बिबट्या'! छायाचित्रकाराचे अफलातून कौशल्य title=

नैरोबी : वेगाचा समानार्थी म्हणजेच बिबट्या, ताशी 100 किलोमीटर (100 KMPH) वेगाने धावणे हे बिबट्याचे वैशिष्ट्य. अत्यंत वेगवान आणि चपळ अशा या बिबट्याला एका वन्यजीव छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात अशा प्रकारे कैद केले आहे की, हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हे छायाचित्रकार आहेत पॉल गोल्डस्टीन. केनियाच्या मसाई मारा नॅशनल पार्कमध्ये वाइल्ड लाइफ फोटोग्राफर पॉल गोल्डस्टीन (Wimbledon Wildlife Photographer Paul Goldstein) यांनी काढले आहेत. पॉल यांनी हा फोटो त्यांच्या फेसबुकवर शेअर केला आहे. या सुंदर प्राण्याचे अप्रतिम फोटो काढल्याचा आनंद व्यक्त करतानाच असे क्षण मंत्रमुग्ध करणारे आहेत, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. 

पॉल गोल्डस्टीन यांनी हा फोटो अशा प्रकारे टिपला आहे की, एकाच बिबट्याचे डोके एकाच आहे. मात्र, तीन वेगवेगळ्या दिशांना बघताना त्याचा हा फोटो घेतला असून यात त्या बिबट्याला तीन डोकी (Three Headed Cheetah) असल्याचा भास होत आहे. या फोटोला आतापर्यंत 2.1 हजार लाईक्स आणि 150 हून अधिक शेअर्स मिळाले आहेत. या फोटोमध्ये चित्ताची तीन डोकी पाहून लोक त्यांचे कौतुक करत आहेत. 

या एका क्लिकसाठी पॉल यांना पावसात सात तास घालवावे लागले. त्यानंतर हा अनोखा फोटो त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा फोटो काढण्यामागची त्यांची मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे.