100 वर्षे जुन्या वर्तमानपत्रात 2024 बद्दलची भविष्यवाणी, काय आणि किती खरं ठरलं?

Trending News In Marathi: भविष्यात पुढे घडणाऱ्या संकेतांबाबत भविष्यवाणी केल्या जातात. मात्र अशा भविष्यवाणी खऱ्या ठरतात का. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 26, 2024, 01:57 PM IST
100 वर्षे जुन्या वर्तमानपत्रात 2024 बद्दलची भविष्यवाणी, काय आणि किती खरं ठरलं? title=
trending news today Shocking prediction for 2024 100 year old newspaper

Trending News In Marathi: भविष्यात पुढे काय घडणार याबाबत वर्तमानात कळलं तर काय होईल, अशी उत्सुकता सर्वांनाच असते. शेअर बाजार असो किंवा जगात पुढे काय घडणार याच्या भविष्यवाणी लोकांना आकर्षित करत असतात. अलीकडेच एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात 2024मध्ये काय होईल याची भविष्यवाणी 100 वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. 1924 मध्ये वर्तमानपत्रात आजपासून 100 वर्षांनंतर जग कसे असले याची भविष्यवाणी करण्यात येत होती. आता या वर्तमानपत्राने केलेल्या काही भविष्यवाण्या तर अगदी खऱ्या ठरल्या आहेत तर काही भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याच्या मार्गावर आहेत. काय आहे नेमकं प्रकरण?

1924मध्ये करण्यात आली होती 2024ची भविष्यवाणी 

कॅनडाच्या कॅलगरी विश्वविद्यालयात रिसर्चर असणाऱ्या पॉल फेरी यांनी एक्स (ट्विटर)वर 1924 च्या सालचे एक वर्तमानपत्र शेअर करण्यात आले होते. या वर्तमानपत्रात 2024ची भविष्यवाणी करण्यात आली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, 2024पर्यंत कदाचित घोडे विलुप्त होतील. मात्र असं काही घडलं नाहीये. पण सध्या जगात गाड्यांची संख्या मात्र वाढली आहे. त्यात असंही नमूद केलं आहे की, 2024मध्ये आवाज असणारे कार्यक्रम खूप लोकप्रिय होतील. आजच्या काळात आपण त्याला पॉडकास्ट असं म्हणतो. ही भविष्यवाणी मात्र तंतोतत खरी झाली आहे. या वृत्तपत्रात आणखी एक भविष्यवाणी केली होती ती म्हणजे मनुष्य 100 वर्षांपर्यंत जगेल आणि 75 वर्षांचे लोकही जवान दिसतील. ही मात्र त्यांची भविष्यवाणी काही खरी ठरली नाही. 

या वर्तमानपत्रात केलेल्या काही भविष्यवाण्या मात्र अजिबात खऱ्या ठरल्या नाहीयेत. मात्र 1924 सालातील लोकांचा भविष्यवाणीकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र मजेशीर होता. काही भविष्यवाणी मात्र खऱ्या ठरल्या आहेत. 1924 सालातील लोकांनी तेव्हाच विचार केला होता की 2024मध्ये 100 मजली इमारती बांधण्यात येतील आणि व्हिडिओ असलेले अल्बम येतील. सगळे एकाच भाषेत बोलतील आणि वाद-विवाद संपतील. यातील 50 टक्के भविष्यवाणी खरी ठरली तर काही मात्र स्वप्नच राहिल्यात. 

1924 साली या वर्तमानपत्रात दिलेल्या भविष्यवाणीत त्यांनी हे देखील लिहलं होतं की, ट्रेनचा वेग पहिल्यापेक्षा दुप्पट-तिप्पट वेगाने वाढेल आणि त्यात थेअटर असेल. हे मात्र खरं ठरलं आहे. पूर्वीपेक्षा ट्रेनचा वेग खूपच वेगवान झाला आहे. तर, ट्रेन आणि विमानात इन्फोटेनमेंट सिस्टम आता देण्यात आली आहे. घरात चित्रपट पाहणे OTT प्लेटफॉर्ममुळं खूपच सामान्य झालं आहे.