VIDEO : महिला ओरडत होती, रडत होती, मात्र 'तो' थांबत नव्हता; भररस्त्यात त्या व्यक्तीचं संतापजनक कृत्य

Viral Video :   ती रस्त्यावर ओरडत होती, आक्रोश करत होती...मदतीसाठी भीक मागतं होती, पण तो निर्दयी व्यक्ती काही केल्या थांबत नव्हता. या माणसाचं अमानुष कृत्य पाहून नेटकरी संतापले आहेत. 

Updated: Jan 15, 2023, 11:18 PM IST
 VIDEO :  महिला ओरडत होती, रडत होती, मात्र 'तो' थांबत नव्हता; भररस्त्यात त्या व्यक्तीचं संतापजनक कृत्य title=
Trending video inhumane us man spraying water on woman viral on Social media

Trending Video : उत्तर भारतात थंडीचा कहर पाहिला मिळतो आहे. राज्यातही हुडहुडी भरली आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ म्हणजे माणुसकीला काळिमा आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने महिलेसोबत जे कृत्य केलं आहे ते पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. आपण अनेक वेळा रस्त्यावर झोपणारे गरीब लोकांसोबत अमानुष कृत्य करताना पाहिले आहेत. ते गरीब असले तरी आपल्यासारखेच हाडामांसाचे माणूसचं असतात. तरी त्यांचासोबतचं अशा कृत्याचं निषेध आहे. 

अमानुषपणाचा कळस!

सर्वत्र थंडीचं साम्राज्य पसरलं आहे. अनेक ठिकाणी थंडीमुळे बर्फवृष्टीदेखील होते आहे. थंडी असूनही गरीबांना रस्त्यावर झोपण्याशिवाय पर्याय नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महिला ओरडतेय, मदत मागतेय पण तो निर्दयी व्यक्ती काही केल्या थांबत नव्हता. थंडीने तिला हुडहुडी भरली होती पण तो व्यक्ती तिचावर थंड पाण्याने फवारा मारत होती. तिच्यावर ओरडतं होता...धक्कादायक म्हणजे तो व्यक्ती हे कृत्य करताना हसत होता. ती महिला त्याचा दुकानासमोर का झोपली आहे या रागाने तो व्यक्ती तिला तिथून हकलण्यासाठी हे करत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   (Trending video inhumane us man spraying water on woman viral on Social media )

कुठली आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ अमेरिकेतील असून या व्हिडीओची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये निर्दयी व्यक्तीचं नाव कोलियर असं आहे.  पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केल्यावर त्याने सांगितलं की, दुकानाबाहेरील जागा धुतं असताना ही माणसं जागेवरून उठतं नव्हती म्हणून त्याने असं कृत्य केलं. यावेळीच शेजारी दुकानातील एका व्यक्तीने घटनेची व्हिडीओ बनवला आणि तो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.