निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प इराणचा वापर करतायंत का?

निवडणूकीत ट्रम्प हे इराणचा मुद्दा उचलणार का?

Updated: Jan 9, 2020, 08:22 PM IST
निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प इराणचा वापर करतायंत का? title=

वॉशिंग्टन: यंदाचं वर्ष अमेरिकेसाठी महत्त्वाचं आहे. कारण नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी अमेरिका आपला पुढला अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करणार आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प या निवडणुकीत इराण आणि सुलेमानींचा मुद्दा वापरण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टर्मसाठी नशिब आजमावणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ट्रम्प यांची लोकप्रीयता कमी झाली आहे. ट्रम्प आपल्या पदाचा स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोप करून डेमोक्रॅटिक पक्षानं महाभियोगही चालवलाय. त्यामुळेच ट्रम्प पुन्हा अमेरिकन राष्ट्रवादाचं कार्ड खेळण्याच्या तयारीत असावेत. 

इराणच्या मिसाईल हल्ल्यानंतर बुधवारी ट्रम्प यांनी केलेल्या निवेदनामध्ये याची झलक दिसली. सुलेमानी अमेरिकन नागरिकांच्या कसा जीवावर उठला होता, हे सांगतानाच आपल्याच कार्यकाळात लष्कर बळकट झालं, आपणच आयसिसचा खात्मा केला हे सांगायला ट्रम्प विसरले नाहीत. पण २०११ साली ट्रम्प यांनी तेव्हाचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा हे इराणचा निवडणुकीसाठी वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण या म्हणीचा प्रत्ययच ट्रम्प देत आहेत. पण राजकारण, युद्ध आणि प्रेमात सर्व क्षम्य असतं असं म्हणतात. आणि इथे तर तीन्ही आहे. अमेरिकन निवडणुकीचं राजकारण आहे, त्यासाठी इराणसोबत छेडलेलं प्रॉक्सी वॉर आहे. ट्रम्प स्वतःच्या प्रचंड प्रेमात आहेत. सुलेमानी यांचा पोस्टर बॉय म्हणून वापर एवढं पुरेसं आहे.