Turkish Greece Tension: जगात आणखी एका मोठ्या युद्धाचा धोका वाढला, तुर्कस्तानची या शेजारी देशाला धमकी

Turkish President Recep Tayyip Erdogan: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असताना आणखी एका युद्धाचा धोका वाढला आहे. तुर्कस्तानने शेजारी देशाला धमकी दिल्याने तणाव वाढला आहे.

Updated: Sep 7, 2022, 01:37 PM IST
Turkish Greece Tension: जगात आणखी एका मोठ्या युद्धाचा धोका वाढला, तुर्कस्तानची या शेजारी देशाला धमकी   title=

ग्रीस : Turkey threatens Greece: रशिया आणि युक्रेनमधील भयानक युद्धाला 6 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. परंतु अद्याप त्यांच्यातील युद्ध थांबलेले नाही. त्याचवेळी जगात आणखी एका मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तुर्कस्तानने शेजारी देश ग्रीसला धमकी दिली आहे. तुर्कस्तानपेक्षा लहान असणाऱ्या या देशाला युद्धाचे परिणाम भोगायला तयार राहा, अशी धमकी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगन (Turkish president recep tayyip erdogan) यांनी दिली आहे. तुर्कस्तानचे म्हटले आहे की जर त्याच्या संयमाचा अंत झाला तर त्याचे सैन्य कोणत्याही क्षणी रात्रीच ग्रीसमध्ये प्रवेश करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

तुर्कीने ग्रीसला दिली युद्धाची धमकी 

स्वत:ला इस्लामिक जगताचा खलीफा म्हणवून घेऊ इच्छिणारे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगन सध्या बोस्नियाची राजधानी साराजेव्होच्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी सांगितले की, ग्रीसने आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करून वादग्रस्त बेटांवर सैन्य आणि शस्त्रे तैनात केली आहेत. त्यांनी तेथे आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडारही बसवले आहेत. हे रडार तुर्कस्तानच्या उडणाऱ्या लढाऊ विमानांना लॉक करून निरीक्षण करतात. ही परिस्थिती तुर्कस्तानला मान्य नाही. 

'कोणत्याही रात्री आमचे सैन्य घुसतील'

रेसेप तैयिप एर्दोगन (Turkish president recep tayyip erdogan) म्हणाले की, जर ग्रीस  (Greece) सहमत नसेल आणि तुर्कीला धोका वाढला तर वेळ आल्यावर त्याचे सैन्य कोणत्याही रात्री ( (Greeceमध्ये) प्रवेश करेल आणि ही कल्पनारम्य नाही. तुर्की आपल्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही आणि गरज पडल्यास बळाचा वापर करण्यापासून मागे हटणार नाही, असे एर्दोगन म्हणाले.

'हल्ला करण्यापूर्वी तुर्कीने 3-4 वेळा विचार करावा'

एर्दोगन यांच्या या धमकीला ग्रीसनेही  (Greece) सडेतोड उत्तर दिले आहे. ग्रीसचे परराष्ट्र मंत्री निकोस डेंडियास म्हणाले, 'जे लोक आपल्यावरील हल्ल्यांबद्दल बोलत आहेत, त्यांनी 3-4 वेळा त्याच्या परिणामांचा विचार केला पाहिजे. आपण आपल्या देशाचे रक्षण करण्यास आणि त्याची अखंडता राखण्यास सक्षम आहोत. त्यांनी आमच्या देशात घुसण्याची हिंमत दाखवली तर त्यांना जशाच तसे उत्तर मिळेल. त्यानंतर हाहाकार माजतेल, हे लक्षात घ्या.

तुर्कस्तानने सैन्य बेटावर केले तैनात  

ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, तुर्कीने त्याच्या पूर्व एजियन बेटांजवळ सैन्य गोळा केले आहे. त्यांची लढाऊ विमानेही ग्रीसच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत हवेत उडत आहेत. त्यांचे नौदल देखील सतत ग्रीसच्या समुद्र हद्दीचे उल्लंघन करत आहे. हे मोठे मुद्दे आहेत, जे या क्षेत्रात तुर्की कशी मनमानी करत आहे हे दर्शवतात, असे ग्रीकने म्हटलेय. 

गेल्या अनेक दशकांपासून हा वाद  

तुर्कस्तान आणि ग्रीसमध्ये गेल्या अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. या वादाचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे दोन देशांदरम्यान पडणारा Aegean समुद्र. या समुद्रात अनेक बेटे आहेत, जी ग्रीसच्या ताब्यात आहेत. ही बेटे ग्रीसच्या मुख्य भूमीपासून दूर आणि तुर्कीजवळ आहेत. तुर्कस्तानचा दावा आहे की ही बेटे मुख्य भूभागाच्या जवळ असल्यामुळे ती आपली आहेत. Aegean समुद्रावरून उड्डाण करण्याच्या अधिकाराबाबतही दोन्ही देशांमध्ये गंभीर मतभेद आहेत. 

युद्ध 3 वेळा झाले

गेल्या अर्ध्या शतकात दोन्ही देशांमध्ये तीन वेळा युद्ध झाले आहे. मात्र, इतर शेजारी देशांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण पुन्हा थंडावले. आता तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या धमकीमुळे दोघांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुर्कस्तानच्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रीसने फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी केली आहेत आणि स्वतःला इतर शस्त्रास्त्रांनीही सज्ज केले आहे. यामुळे तुर्कस्तान संतापले असून ते आपल्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे सांगत आहे. पुढच्या वर्षी तुर्कस्तानमध्येही निवडणुका आहेत, ज्यातरेसेप तैयिप एर्दोगनही आघाडी घेण्यासाठी ही ठिणगी पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बोलले जात आहे.