'जुळ्या बहिणींच्या जुळ्या इच्छा', एकाच माणसाशी लग्न, आणि एकाच वेळी प्रेग्नेंट होण्याचीही इच्छा...

जुळ्या भावंडांचा एकमेकांवर फार जीव असतो. 

Updated: Jun 16, 2021, 01:24 PM IST
'जुळ्या बहिणींच्या जुळ्या इच्छा', एकाच माणसाशी लग्न, आणि एकाच वेळी प्रेग्नेंट होण्याचीही इच्छा... title=

मुंबई : जुळ्या भावंडांचा एकमेकांवर फार जीव असतो. जुळी भावंड दिसायला सारखी असतात सोबतच अनेकजण कपडे देखील सारखेच घालतात. पण तुम्ही कधी असं ऐकलंय का की जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीशी लग्न केलंय? हे वाक्य वाचून तुम्हाला आश्चर्याने नक्कीच हसू आलं असेल. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न करणार आहेत. इतकंच नव्हे तर आता त्यांची एकाचवेळी गरोदर राहण्याचीही इच्छा आहे.

या दोन्ही बहिणींनी एका रिअॅलीटी टीव्ही शोमध्ये त्यांची ही इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी या बहिणींनी कशा त्या दोघी एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्या हे देखील सांगितलं. 35 वर्षीय जुळ्या बहिणी अॅना आणि ल्युसी या दोघींनी 37 वर्षीय बेन बायर्नससोबत साखरपुडा केला.

अॅना आणि ल्युसी 2011 पासून बेन बायर्नला डेट करत होत्या. आपल्या लव्ह स्टोरीबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, बेनने एका पार्कमध्ये पिकनिक दरम्यान दोघींना प्रपोज केलं होतं. आणि दोघींनीही त्याला होकार दिला होता.

दरम्यान दोन विवाह करण्यास ऑस्ट्रेलियामध्ये कायदेशीर मान्यता नाहीये. मात्र हे मलेशिया, इंडोनेशिया किंवा अमेरिकेत जाऊन लग्न करू शकतात. तर दुसरीकडे, अॅना आणि ल्युसी एकाच वेळी गर्भवती होऊ इच्छितात. यासाठी त्या आयव्हीएफचा विचार करत आहेत.