ट्विटरवर हॅकर्सचा मोठा हल्ला, दिग्गजांचे अकाऊंट हॅक

ट्विटरकडून दुरुस्तीचं काम सुरु असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

Updated: Jul 16, 2020, 08:30 AM IST
ट्विटरवर हॅकर्सचा मोठा हल्ला, दिग्गजांचे अकाऊंट हॅक title=

मुंबई : ट्विटर हॅकर्सने मोठा हल्ला केला आहे. जगभरातील अनेक मोठ्या व्यक्तींचे अकाऊंट हॅक झाले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बाइडेन, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सारख्या मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय उद्योगपती एलन मस्क, जेफ बेजोस आणि बिल गेट्ससह अनेक उद्योगपतींचे अकाऊंट देखील हॅक झाले आहेत.

हॅक केलेल्या अकाऊंट्सवरुन पोस्ट करत त्यामध्ये बिटकॉइनमध्ये दान मागण्यात आलं आहे. अनेक खोटो ट्विट करण्यात आले. बिटकॉइनच्या दुप्पट परत केले जातील. पोस्ट झाल्यानंतर काही मिनिटात हे ट्विट डिलीट झाले.

पण या काळात हॅकर्सला शेकडो लोकांनी एक लाख डॉलर पेक्षा अधिकची रक्कम पाठवली. ट्विटरने म्हटलं की, आमच्यासाठी ही परिस्थिती आव्हानात्मक होती. आमची टीम याला दुरुस्त करत आहे.

या दिग्गज व्यक्तींचे अकाऊंट हॅक

- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

- राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन

- इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

- टेस्लाचे सीईओ एलन मस्क

- अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस

- अमेरिकेचा प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट

- अमेरिका टीवी स्टार किम कर्दाशियन

- माइक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स

- बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफेट

- माइक ब्लूमबर्ग

- अमेरिकेचे रॅपर विज खलीफा

- यूट्यूबर मिस्टर बीस्ट

- उबर आणि ऐपल कंपनीचे कॉरपोरेट अकाउंट